शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मातीचे बैल बनविण्याची परंपरा अद्यापही टिकून

By admin | Updated: July 17, 2017 00:15 IST

नाशिक : वर्षभर शेतात मेहनत करून, धान्य पिकवणाऱ्या बळीराजाला लाख मोलाची मदत करणाऱ्या सर्जा राजाची सन्मानाने पूजा करून, त्याला गोडधोड खाऊ घालून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा

भाग्यश्री मुळे। लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वर्षभर शेतात मेहनत करून, घाम गाळून धान्य पिकवणाऱ्या बळीराजाला लाख मोलाची मदत करणाऱ्या सर्जा राजाची सन्मानाने पूजा करून, त्याला गोडधोड खाऊ घालून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या सणाची तयारी बाजारात वेगाने सुरू आहे.  जिवंत बैलांबरोबरच घरोघरी मातीच्या बैलांचीही पूजा केली जाते. अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. त्यामुळे जुन्या नाशकातील कुंभारवाड्यात हे मातीचे बैल तयार करण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. घरटी ८ ते ९ हजार बैल तयार झाले असून, रंगरंगोटीचे काम बाकी आहे. आजच्या आधुनिक युगातही कुंभारवाड्याने मातीचे बैल तयार करण्याची परंपरा आजही टिकवून ठेवली आहे.  कुंभारवाड्यात मातीच्या बैलांनी सुबक आकार घ्यायला सुरुवात केली आहे. कुंभारवाड्यात घरोघरी हजारोंच्या संख्येने मातीचे बैल तयार होत असून, महागाईचा फटका बसत असला तरी बैल तयार करण्याची कला जोपासली जात आहे. नाजूक कौशल्याचे, दीर्घकाळ बैठकीचे आणि मेहनतीचे असणारे हे काम दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या न परवडणारे होत चालले आहे. बैलनिर्मितीचे कौशल्य नविन पिढीही आवडीने शिकत आहे. साहित्याला महागाईचा फटकाबैल बनवण्यासाठी चिकण माती, शेण, राख, पाणी असे साहित्य लागते. मातीच्या एका टेम्पोला ५०० रुपये खर्च येतो. शेण २० रुपये प्रतिपाटी या दराने खरेदी करावे लागते. रंगांच्या किमतीही दरवर्षी वाढत आहेत. या साहित्यावर कर नसला तरी त्याचे भाव दुपटीने वाढले आहेत. कुंभारवाड्यातून व्यापारी २ ते ३ रुपये प्रतिबैल या दराने होलसेल भावात खरेदी केले जातात. छोटे विक्रेते उपनगरांमध्ये ते दुकान, हातगाड्यांवरून २५ ते ३० रुपये जोडी या दराने विकतात.