टॉवर कोसळला

By Admin | Updated: September 11, 2016 00:40 IST2016-09-11T00:40:25+5:302016-09-11T00:40:34+5:30

टॉवर कोसळला

Tower collapses | टॉवर कोसळला

टॉवर कोसळला

दिंडोरी : जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी तालुक्यातून जाणाऱ्या प्रस्तावित पॉवरग्रिड टॉवर लाइनला शेतीचे नुकसान व सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला; मात्र प्रशासनाने विरोध डावलत टॉवर उभारणी सुरू ठेवली असतानाच दिंडोरी तालुक्यातील अवनखेड शिवारात मनोरा उभारणी करत असताना ३०० फुटाचा मनोरा कोसळला असून, तीन कामगार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. या ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने मदत करत कामगारांना टॉवर खालून बाहेर काढले. बिदु बगराय सोरेन (२२), सुजल तुडू आणि इकबाल जुलूस शेख (२२) अशी जखमी कामगारांची नावे आहेत.
दिंडोरी व निफाड तालुक्यातील क्षेत्रातून जी विद्युतवाहिनी प्रस्तावित आहे त्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षबागा असून, या परिसरातील नागरिक वस्तीवर राहतात मात्र प्रशासनाने शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता टॉवरचे काम सुरू केले गेल्यास आठवड्यात शिरवाडे वणी शिवारात शेतकऱ्यांनी सरण रचत आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र प्रशासनाने मध्यस्थी करत फेरसर्वेक्षणाचे आश्वासन दिले होते. अवनखेड शिवारात गोटीराम माधव मोरे यांच्या उभ्या पिकात टॉवर उभारणी करण्याचे काम सुरू केले होते. मोरे यांनी विरोध केला होता मात्र त्यांना न जुमानता काम सुरू ठेवले होत.(वार्ताहर)




 

Web Title: Tower collapses