शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे उद्या वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 01:04 IST

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे गुरुवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मुंबई - आग्रा रोडवरील हॉटेल एक्स्प्रेस इनमधील रॉयल हॉलमध्ये वितरण होणार आहे.

नाशिक : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे गुरुवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मुंबई - आग्रा रोडवरील हॉटेल एक्स्प्रेस इनमधील रॉयल हॉलमध्ये वितरण होणार आहे. या स्पर्धेत कोण बाजी मारतो याबाबत गावागावांतील सरपंचांमध्ये उत्सुकता लागली आहे. गेल्या १९ फेबु्रवारी रोजी लोकमतच्या नाशिक शहर कार्यालयात झालेल्या ज्युरी मंडळाच्या बैठकीत बारकोड पद्धतीने विविध १३ कॅटेगिरीमधील सरपंचांची निवड निश्चित करण्यात आली असून, ही सर्व नावे गुलदस्त्यात आहेत.गावाच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या विजेत्या सरपंचांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ.शीतल सांगळे, बीकेटीचे महाराष्टÑातील अ‍ॅग्री सेलचे सहायक व्यवस्थापक जुबेर शेख, बीकेटीचे अधिकृत वितरक सूरज धुत, सुयोजित ग्रुपचे संचालक अनंत राजेगावकर आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक चेअरमन सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील जयंत पाटील तसेच महिलाराज सत्ता आंदोलनाच्या अमरावती विभागीय समन्वयक, यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या माजी सरपंच अर्चना जतकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.बीकेटी टायर्स या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक तर पतंजली आयुर्वेद सहप्रायोजक आहेत. राज्यात लोकमतने प्रथमच सुरू केलेल्या या उपक्रमास सलग दुसऱ्या वर्षीही जिल्ह्यातील सरपंचांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, विविध कॅटेगिरीमध्ये जिल्ह्यातील ३००पेक्षा अधिक सरपंचांनी प्रवेशिका दाखल केल्याने मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली आहे. या सोहळ्यास स्पर्धेत सहभागी सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमततर्फे करण्यात आले आहे.११ कॅटेगिरीसह दोन विशेष पुरस्कारसरपंचांनी गावात जल, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामरक्षण, पर्यावरण इ. प्रशासन/लोकसहभाग, रोजगारनिर्मिती, कृषी तंत्रज्ञान या ११ कॅटेगिरीत केलेल्या कामांची दखल घेऊन या प्रत्येक क्षेत्रासाठी ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ दिले जाणार आहे. याशिवाय उदयोन्मुख नेतृत्व आणि सरपंच आॅफ द इयर हे दोन विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत.कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहाणारे जयंत पाटील हे सन १९९५ पासून कुर्डुवाडी ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच व सदस्य म्हणून कार्यरत आहेत. २००३ मध्ये त्यांनी राज्यस्तरीय सरपंच संघटनेची स्थापना केली. २००४ मध्ये त्यांनी कुर्डुवाडी येथे पहिले राज्यस्तरीय सरपंच अधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशनात राज्यभरातील १४ हजार सरपंच उपस्थित होते. सध्या ते ग्रामविकास मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.महिलाराज सत्ता आंदोलनाच्या अर्चना जतकर या पुसदच्या माजी सरपंच असून, दोन पंचवार्षिक त्या सरपंच म्हणून कार्यरत होत्या. सध्या त्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. पंचायतराज आणि आमचं गाव आमचा विकास या दोन संस्थांवर त्या तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटNashikनाशिक