नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर बस ट्रॅक्टरचा भीषण अपघात; तीन महिला मजूर गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 19:47 IST2018-04-23T18:52:40+5:302018-04-23T19:47:40+5:30
नाशिक-त्रंबकेश्वर रस्त्यावर आता सातपूर गावाजवळ बस-ट्रॅक्टर चा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिला गंभीरपणे जखमी झाल्या आहेत.

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर बस ट्रॅक्टरचा भीषण अपघात; तीन महिला मजूर गंभीर
नाशिक - नाशिक-त्रंबकेश्वर रस्त्यावर आता सातपूर गावाजवळ बस-ट्रॅक्टर चा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. रस्ता सुरक्षा अभियानाला गालबोट लागला. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता. संध्याकाळी झालेल्या या अपघातात भरधाव बसचालकाचे नियंत्रण सुटले. आणि रस्त्याच्या मध्यभागी स्वछतेचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराच्या चालकाने माती भरण्यासाठी उभ्या केलेल्या ट्रॅक्टर वर बस जाऊन आदळली. धडक एवढी जोरदार होती की बंद ट्रॅक्टर पंधरा फुटापर्यंत पुढे जाऊन डावीकडे असलेल्या मूर्तिकाराच्या झोपडीत शिरला. सुदैवाने येथे असलेल्या झाडामुळे ट्रॅक्टर अडकला अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. एका महिलेला अपघात आपले दोन्ही पाय गमवावे लागले. बसचालक देखील जखमी झाला आहे.
अपघातग्रस्त बस