शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

फोनकॉलद्वारे आर्थिक लूट करणाऱ्या तिघांना दिल्लीतून अटक ; नाशिक पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 7:06 PM

वेगवेगळ््या बँकांच्या ग्राहकांना फोन करून त्यांच्या खात्याविषयी गोपनीय माहिती विचारत आॅनलाइन फसवणूक करणाऱ्या तिघांच्या नाशिक शहर पोलिसांच्या पथकाने दिल्लीतून मुसक्या आवळल्या आहे. त्यांच्याकडून ८१ सीम कार्ड, १० मोबाईल,फिंगर प्रिंट स्कॅनर, १० हजारांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शुक्रवारी (दि.३०) आयुक्तलयातील पत्रकार परिषदेत दिली आहे. 

ठळक मुद्दे ऑनलाइन फसवणूक करणारे तिगे गजाआड दिल्लीतून चालवत होते बोगस कॉलसेंटर नाशिक पोलीसांनी सापळा रचून केले अटक

नाशिक : वेगवेगळ््या बँकांच्या ग्राहकांना फोन करून त्यांच्या खात्याविषयी गोपनीय माहिती विचारत आॅनलाइन फसवणूक करणाऱ्या तिघांच्या नाशिक शहर पोलिसांच्या पथकाने दिल्लीतून मुसक्या आवळल्या आहे. निशांतकुमार ओमप्रकाश सिंग (२३, रा.उत्तर प्रदेश), मोहम्मद रयाझउद्दीन फेजल (२२, रा.पटना, बिहार), तरूणकुमार सिंग (२४, रा.मथुरा, उत्तर प्रदेश)अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून यांच्याकडून ८१ सीम कार्ड, १० मोबाईल,फिंगर प्रिंट स्कॅनर, १० हजारांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शुक्रवारी (दि.३०) आयुक्तलयातील पत्रकार परिषदेत दिली आहे. फोनकॉलद्वारे आपल्या खात्याची माहिती जाणून घेत फसवणूक झाल्या प्रकरणी १२ ते २१ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत फसवणूक झाल्याची फिर्याद नंदु दत्तू भिसे (३०) यांनी दिली होती. या प्रकरणात तिघा संशयितांनी मोबाईलवर भिसे यांच्याश्ी संपर्क साधत स्टेट बँकेतून बोलत असल्याचे भासवून त्यांच्या एटीएमविषयी माहिती घेऊन मोबाईलवर आलेला ओटीपी मागवून घेत १ लाख ८९ हजार ३८६ रुपये आॅनलाईन बँकींगच्या माध्यमातुन परस्पर काढून घेत फसवणुक केली होती.  या प्रकरणाचा सायबर पोलीस शाखेने सखोल तपास केलानंतर तीन जण संगनमताने दिल्लीतून बोगस कॉल सेंटर चालवित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी बँक स्टेटमेंट व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचून नवी दिल्लीतील कॉल सेंटरचा पत्ता शोधून स्थानिक पोलीसांच्या मदतीने छापा टाकला. या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून १० मोबाईल फोन, फिंगर प्रिंट स्कॅनर, ३४ सिमकार्ड, १० हजार रुपये जप्त केले. तिघांनाही  न्यायायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, तिघांनी १५ लोकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले असून या मागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलPoliceपोलिसArrestअटक