शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आमदार तीन, जागा अवघ्या पाच...

By admin | Updated: February 25, 2017 00:57 IST

दोन प्रभागांतील निकाल आत्मपरीक्षण करायला लावणारा

संजय पाठक : नाशिकउच्चभ्रू वसाहत म्हणजे भाजपाची मतपेढी असे मानल्या जात असले तरी नाशिक महापालिकेच्या पश्चिम प्रभागात हे आताच साध्य झाले आहे. कॉँग्रेससह सर्वच पक्षांच्या प्रभावात कमी अधिक असलेल्या या प्रभागात आज जोडलेल्या दोनच प्रभागांत भाजपाने आठपैकी पाच जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे ज्या एका प्रभागात तीन भाजपा आमदार आहेत, त्या प्रभागातही संपूर्ण पॅनल विजयी न होणे ही बाब खचीतच आत्मपरीक्षण करायला लावणारी ठरली आहे. सीबीएसकडून पश्चिमेचा भाग असलेल्या पश्चिम प्रभागात मध्य नाशिकचे काही प्रभाग जोडले जातात. त्यामुळे केवळ गेल्यावेळेचाच विचार केला तर सात द्विसदस्यीय प्रभागात १४ पैकी भाजपाच्या वाटेला अवघ्या तीन जागाच होत्या. त्यापेक्षा अधिकतम मनसेच्या म्हणजेच पाच, त्याखालोखाल चार जागा कॉँग्रेस, तर दोन जागा सेनेच्या ताब्यात होत्या. आता प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने दोनच चार सदस्यीय प्रभाग जोडल्या गेलेल्या पश्चिम प्रभागात जेमतेम आठ जागा. अशा स्थितीत लागलेल्या निकालाने भाजपाच्या वाटेला पाच आणि दोन कॉँग्रेस, तर एक जागा शिवसेनेला मिळाली आहे. मनसेचा अपेक्षेनुसार विषय संपला आहे. या प्रभागात सात आणि बारा असे दोनच प्रभाग असून, प्रभाग सातमध्ये भाजपाचे एक नव्हे तर तीन आमदार आहेत. प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि डॉ. राहुल अहेर यांची प्रभागात प्रतिष्ठा पणाला लागली असली तरी ती केवळ सोयीच्याच ठिकाणी होती का? असा प्रश्न निर्माण व्हावा अशी स्थिती आहे. याचे कारण म्हणजे सीमा हिरे आणि डॉ. राहुल अहेर या आमदारद्वयींची प्रतिष्ठा जणू त्यांच्या कुटुंबीयांमधील योगेश हिरे आणि गौरी अहेर आडके यांच्या पुरतीच सीमित होती.  फरांदे यांनी आग्रहाने उमेदवारी मिळवून दिलेल्या स्वाती भामरे विजयी झाल्या, परंतु शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना मात्र त्या रोखू शकल्या नाहीत. त्यामुळे तीन तीन भाजपा आमदार असलेल्या प्रभागात बोरस्ते निवडून आलेले हे भाजपाला वर्मी लागायला हवे होते, परंतु तसे झाले नाही. बाकी प्रभाग १२ मध्ये भाजपाचे शिवाजी गांगुर्डे आणि प्रियंका घाटे हे दोघे निवडून येऊ शकले. अन्य दोन प्रभागांमध्ये कॉँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील व समीर कांबळे हे विजयी झाले. मतदारसंघावर प्रभुत्व नाहीएखाद्या विभागात किंवा तालुक्यात एक आमदार असला तर त्या संपूर्ण मतदारसंघावर त्यांचे प्रभुत्व मानले जाते, परंतु मध्य नाशिकमध्ये भाजपाचे तीन आमदार एकाच भागात असताना दोन प्रभागांवरही ताबा घेऊ शकले नाही, ही चूक कोणाची हे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.  महात्मानगर ते मुंबई नाका या भागापर्यंत आजवर कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि काही प्रमाणात मनसेचा प्रभाव राहिला आहे. या प्रभागात भाजपाचा जो प्रभाव वाढणे अपेक्षित होता. तो मात्र वाढला नाही. त्यामुळे पक्षातील मूळ इच्छुकांवर विश्वास न टाकता चार आयात उमेदवारांवरही निवडणूक लढली गेली आणि त्यात शिवाजी गांगुर्डे व प्रियंका घाटे या दोघांनी बाजी मारली. त्यामुळे हा प्रभाव भाजपाच की संबंधित उमेदवारांचा, अशी शंका घेण्यास जागा आहे.