विवाह समारंभातून तीन लाखांच्या दागिन्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 00:33 IST2018-12-27T00:33:22+5:302018-12-27T00:33:51+5:30
लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आलेल्या मुंबईतील उल्हासनगरमधील महिलेचे पावणेतीन लाख रुपयांचे सोने व हिऱ्याच्या दागिन्यांची बॅग चोरट्याने चोरून नेल्याची घटना गंगापूर रोडवरील बालाजी लक्ष्मीनारायण बॅक्वेंट लॉन्समध्ये सोमवारी (दि़२४) रात्रीच्या सुमारास घडली़

विवाह समारंभातून तीन लाखांच्या दागिन्यांची चोरी
नाशिक : लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आलेल्या मुंबईतील उल्हासनगरमधील महिलेचे पावणेतीन लाख रुपयांचे सोने व हिऱ्याच्या दागिन्यांची बॅग चोरट्याने चोरून नेल्याची घटना गंगापूर रोडवरील बालाजी लक्ष्मीनारायण बॅक्वेंट लॉन्समध्ये सोमवारी (दि़२४) रात्रीच्या सुमारास घडली़ गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोहनी राजू उत्तमानी (५४, रा़ ३०१, भारत कॉम्प्लेक्स, उल्हासनगर) या सोमवारी नातेवाइकांच्या लग्नाच्या विवाह समारंभासाठी गंगापूर रोडवरील लक्ष्मीनारायण बॅक्वेंट हॉल येथे आल्या होत्या़ रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास १८ ते २२ वर्षांच्या संशयिताने जेवणाच्या टेबलजवळ ठेवलेली त्यांची बॅग व त्यातील २ लाख ७४ हजार ३०० रुपये किमतीचे सोने व हिºयाचे दागिने चोरून नेले़ या बॅगमधील चोरी गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याच्या साखळीत हिरे असलेले मंगळसूत्र, दोन सोन्याच्या चेन, चार पँडल सेट, हिरेजडीत सोन्याचे ब्रेसलेट, चार हिरेजडीत अंगठ्या, हिरेजडीत एअररिंग्ज व ६ हजार ३०० रुपये रोख रकमेचा समावेश आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गेल्या काही दिवसांपासून शहरातील सिडको, सातपूर, पंचवटी, इंदिरानगर भागात भुरट्या चोºयांमध्ये तसेच घरफोड्यांच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषत: गंगापूररोड, कॉलेजरोड भागात चोºया वाढल्या आहेत.