शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

हजारो क्विंटल तूर पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:17 IST

आदिवासी विकास विभागाच्या रेनकोट आणि स्वेटर खरेदीच्या गोंधळानंतर तूरडाळ खरेदी प्रकरण चर्चेत आले असून, हजारो क्ंिवटल तूर चढ्या दराने खरेदी केल्यानंतर आता तुरीचे उतरलेले भाव आणि सातत्याने हजारो क्ंिवटल तूर पावसात भिजून खराब होण्याच्या मार्गावर आहे. ही तूर आता भरडाईला दिली तरीही आदिवासी विकास महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे.

नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या रेनकोट आणि स्वेटर खरेदीच्या गोंधळानंतर तूरडाळ खरेदी प्रकरण चर्चेत आले असून, हजारो क्ंिवटल तूर चढ्या दराने खरेदी केल्यानंतर आता तुरीचे उतरलेले भाव आणि सातत्याने हजारो क्ंिवटल तूर पावसात भिजून खराब होण्याच्या मार्गावर आहे. ही तूर आता भरडाईला दिली तरीही आदिवासी विकास महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे.त्यामुळे ही तूर आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा किंवा वसतिगृहांना पुरविण्यात यावी किंवा तत्काळ विक्री करण्यात यावी, यासाठी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे आदिवासी विकास महामंडळाचे संचालक माजी आमदार धनराज महाले व दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी एका पत्रान्वये मागणी केली आहे. आदिवासी विकास महामंडळाने सन २०१५-१६ या वर्षात नंदुरबार प्रकल्पामार्फत १०१० क्विंटल, धारणी प्रकल्पांतर्गत ७०१५ क्ंिवटल, यवतमाळ ७५०० क्विंटल व नाशिक ३३ क्विंटल अशी एकूण १५५५८ क्विंटल तूर धान्य एकाधिकार खरेदी योजनेंतर्गत खरेदी केले. तसेच सन २०१६-१७ अंतर्गत नंदुरबार प्रकल्पांतर्गत २६० क्ंिवटल, धारणी प्रकल्पांतर्गत ३२७८.३२ क्विंटल, यवतमाळ प्रकल्पांतर्गत २१४४.७४ क्ंिवटल अशी एकूण ५८८३.०६ क्विंटल तूर खरेदी केली आहे. दोन्ही वर्षात मिळून २१ हजार २४१.०६ क्विंटल तूर शिल्लक असून, तुरीचे भाव गडगडले आहेत. आता ही तूर पावसात भिजून आदिवासी विकास महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. भरडाईला देऊनही महामंडळाचे नुकसान होणार असल्याचा दावा आजी-माजी आमदारांनी केला आहे. एक तर ही तूर खुल्या बाजारात तत्काळ विक्री करावी, अथवा आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी तरी वापरायला द्यावी, अशी मागणी आमदार नरहरी झिरवाळ व आदिवासी विकास महामंडळाचे संचालक माजी आमदार धनराज महाले यांनी केली आहे. आधीच रेनकोट आणि स्वेटर खरेदीमुळे चर्चेत असलेले आदिवासी विकास आयुक्तालय आता तूर खरेदीवरून चर्चेत आले आहे.