ओझरला घरफोडी हजारोचे साहित्य लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 01:05 IST2021-06-08T22:30:57+5:302021-06-09T01:05:33+5:30
ओझरटाऊनशिप : गेल्या दिड महिन्यापेक्षा जास्त दिवस बंद असलेल्या ओझर येथील एका हाईट आऊट कॅफेच्या गाळ्याचे लोखंडी शटरचे लॉक तोडून चोरट्याने गाळ्यातील पिज्जा ओव्हन, दोन गॅससिलेंडर सह ४२ हजार पाचशे रूपयांचे साहित्य चोरून नेले.

ओझरला घरफोडी हजारोचे साहित्य लंपास
ओझरटाऊनशिप : गेल्या दिड महिन्यापेक्षा जास्त दिवस बंद असलेल्या ओझर येथील एका हाईट आऊट कॅफेच्या गाळ्याचे लोखंडी शटरचे लॉक तोडून चोरट्याने गाळ्यातील पिज्जा ओव्हन, दोन गॅससिलेंडर सह ४२ हजार पाचशे रूपयांचे साहित्य चोरून नेले.
१५ एप्रिल ते ७ जून या दरम्यान कोरोनामुळे बंद असलेल्या टिळक नगर येथील हाईट आऊट कॅफे या गाळ्याचे लोखंडी शटरचे लॉक तोडून आज्ञात चोरट्याने गाळ्यात प्रवेश करून गाळ्यात असलेले पिज्जा ओव्हन, दोन कमर्शियल गॅस सिलेंडर,एक गॅस शेगडी,आईसक्रिम रोल मशिन, मिक्सर असे ४२ हजार पाचशे रूपयांचे साहित्य चोरून नेले असल्याची तक्रार शुभम नवले रा. इंदिरानगर नाशिक यांनी सोमवारी (दि.७) रात्री नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास पोलिस करत आहेत.