शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

नांदूरशिंगोटेत चोरांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 1:17 AM

नांदूरशिंगोटे येथे चोरांनी गुरुवारी (दि.५) मध्यरात्री नऊ ठिकाणी दुकाने व घरे फोडली. यामध्ये चार ते पाच ठिकाणांहून सुमारे एक लाख रु पयांचा ऐवज चोरीला गेला आहे. एका रेडिमेड कपड्यांच्या दुकानात चोरी करीत असताना चोरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असून, यंत्रणा कामाला लागली आहे.

ठळक मुद्देसीसीटीव्हीत झाले कैद : सहा दुुकाने, चार घरांना केले लक्ष्य

नांदूरशिंगोटे : येथे चोरांनी गुरुवारी (दि.५) मध्यरात्री नऊ ठिकाणी दुकाने व घरे फोडली. यामध्ये चार ते पाच ठिकाणांहून सुमारे एक लाख रु पयांचा ऐवज चोरीला गेला आहे. एका रेडिमेड कपड्यांच्या दुकानात चोरी करीत असताना चोरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असून, यंत्रणा कामाला लागली आहे.नाशिक - पुणे महामार्गावरील नांदूरशिंगोटे येथे मोठी बाजारपेठ आहे. गुरु वारी मध्यरात्री दोन ते पहाटे सव्वाचार वाजेपर्यंत चोरांनी येथील दुकाने व घरांना लक्ष्य केले. रात्री चोरांनी बाजारतळालगत असणाºया उत्तम माळवे यांच्या ज्वेलर्स दुकानाचे शटर तोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांना काही हाती लागले नाही. त्यानंतर नेहरू चौकातील कृष्णाबाई इलग यांच्या बंद असलेल्या घरात चोरीचा प्रयत्न केला. तेथेही काही न मिळाल्याने त्यांनी आपला मोर्चा निमोण रोडलगत असणाºया व्यापारी संकुलाकडे वळविला. येथील एका कापड दुकानाचे शटर तोडून चोरांनी आत प्रवेश केला. चोरांनी जीन्स पॅन्ट, शर्ट आदींसह ५४ हजार रु पयांच्या कपड्यांवर डल्ला मारला. जवळच असलेल्या आॅटोमोबाइल्स व टायरच्या दुकानाचे शटर वाकवून चोरांनी टायर चोरले. अचानक गल्लीतील गर्जे यांचे घर फोडण्याचा प्रयत्नही चोरांनी केला. तेथून हायवेलगत असलेल्या बाळू महादू शेळके यांच्या किराणा दुकानाला लक्ष्य करीत दुकानातील पंधरा ते वीस हजार रु पयांची रोख रक्कम चोरून नेली.मध्यरात्री घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे गावात घबराट निर्माण झाली आहे. पोलिसांनी गावात रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात संपर्ककरून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक माधव पडीले व सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी ताातडीने घटनास्थळी भेट देऊन तपास यंत्रणा कामाला लावली आहे. शाहबाज मणियार यांनी पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली असून, सहायक पोलीस उपनिरीक्षक विकास काळे, हवालदार प्रवीण अंढागळे, एस. एस. चव्हाणके, एन. आर. आडके, आर. के. भांगरे, यू. के. आव्हाड अधिक तपास करीत आहेत.दरम्यान, कापड दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात आले असून, त्या माध्यमातून चोरांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा कार्यरत झाली आहे. चोरांना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने पथके रवाना केली असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक गलांडे यांनी सांगितले.विविध दुकानांमधून रकमेची चोरीचोरांनी गावातील मध्यवर्ती ठिकाणी व पोलीस चौकीपासून काही अंतरावर असणाºया एका कपड्याच्या दुकानावर डल्ला मारला. कापड दुकानाचे मागील बाजूस असणारे शटर तोडून कपड्यांची चोरी केली. गट नंबर ५०७ मध्ये राहणाºया एकनाथ पंढरीनाथ शेळके यांचे धान्य व भुसार मालाचे गुदाम फोडण्याचाही प्रयत्न केला. दुकानातील काही रक्कम घेऊन ते पसार झाले. एका कपड्याच्या दुकानात पहाटेच्या सुमारास चोरी करताना हे चोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.(०६नांदूरशिंगोटे व१)फोटो ओळी : नांदूरशिंगोटे येथील कापड दुकानाचे तोडलेले शटर व सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झालेले चोरटे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी