शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे जीविताला धोका दिसत नाही!

By admin | Updated: March 22, 2015 23:27 IST

पोलिसांचा अजब शोध : तहसीलदारास अग्निशस्त्र देण्यास नकार

नाशिक : नांदगाव, येवला पाठोपाठ देवळा येथेही प्रांत अधिकाऱ्यावर वाळूमाफियांनी हल्ला चढवून त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे दर्शन घडविल्याने समस्त महसूल यंत्रणा जिवाच्या भीतीने धास्तावली असताना, अशा माफियांपासून स्वत:च्या संरक्षणासाठी अग्निशस्त्राचा परवाना मागण्यासाठी गेलेल्या तहसीलदाराला जीवाची भीती नसल्याचा जावई शोध लावून पोलीस यंत्रणेने परवाना नाकारल्याची बाब उघडकीस आली आहे. तहसीलदारांवर यापूर्वी जिवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झालेला असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून परवाना नाकारण्याची बाब म्हणजे वाळूमाफियांना मोकळीक देण्याचीच पोलिसांची कृती असल्याचा अर्थ त्यातून काढला जात आहे. पोलीस यंत्रणेने अग्निशस्त्र नाकारल्याच्या घटनेची महसूल अधिकारी संघटनेने गंभीर दखल घेऊन या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार तर केलीच, पण शासनाच्या निदर्शनास सदरहू बाब आणून देतानाच, पोलीस आयुक्तांच्या परवाना नाकारण्याच्या निर्णयाविरुद्ध थेट गृहखात्याकडे अपील करण्याचाही निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाळूमाफियांनी गुंडगिरीचे प्रदर्शन करीत महसूल यंत्रणेला वेठीस धरले असताना हा प्रकार घडला आहे. नाशिकच्या तहसीलदारांनी पोलीस आयुक्त कार्यालयात अग्निशस्त्र म्हणजेच रिव्हॉल्व्हर बाळगण्याचा परवाना मिळण्यासाठी रितसर अर्ज केला होता. बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन, वाळूची वाहतूक, शासकीय वसुली, मंत्र्यांचा राजशिष्टाचार अशा विविध घटनांना सामोरे जात असताना बऱ्याच वेळी संबंधितांकडून दमदाटी, धमक्या व अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत असल्याने स्वसंरक्षणासाठी अग्निशस्त्र परवाना मिळावा, अशी विनंती त्यांनी अर्जात केली होती. त्यावर पोलीस आयुक्तालयाने तहसीलदार राहत असलेल्या भागातील संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारींकडून तसा अहवाल मागवून खरोखरच तहसीलदारांच्या जीविताला धोका आहे काय याची विचारणा केली. मात्र तहसीलदार ज्या ठिकाणी राहतात, त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या जीविताला धोका असल्याचा कोणताही पुरावा संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारींना आढळून न आल्याने त्यांनी तसे पोलीस आयुक्तांना कळविले. याचाच धागा पकडून पोलीस आयुक्तालयाने नाशिक तहसीलदारांना अग्निशस्त्र परवाना देता येत नसल्याचे कळवितानाच, ‘तुमच्या जीविताला धोका दिसत नाही’ अशी टिप्पणी केली आहे. जीविताला धोका नसल्याचे कारण पुढे करून तहसीलदाराला अग्निशस्त्र परवाना नाकारण्याच्या पोलिसांच्या या कृतीबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात असून, शहरात यापूर्वी अदा करण्यात आलेले सारे परवाने संबंधित व्यक्तीच्या जीविताला धोका आहे किंवा नाही याचा पोलिसांनी शोध घेऊनच दिले काय असा सवाल केला जात आहे.