शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ‘स्वाइन फ्लू’चे २१ बळी

By admin | Updated: April 2, 2017 01:44 IST

नाशिक : जिल्ह्यात स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, गत तीन महिन्यांत २० जणांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक : जिल्ह्यात स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, गत तीन महिन्यांत २० जणांचा मृत्यू झाला आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या म्हसरूळ येथील बाळासाहेब माधव जाधव (५८) यांचा शनिवारी (दि़१) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ यामुळे जिल्ह्यातील स्वाइन फ्लू बळींची संख्या २१ वर पोहोचली आहे़ दरम्यान, जिल्हा रुग्णालयात दररोज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे़ शहर व जिल्ह्यात अशा दोन्ही ठिकाणी स्वाइन फ्लूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे़ शनिवारी (दि़१) पर्यंत जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात सहा, तर महापालिकेच्या रुग्णांलयांमध्ये ३१ अशा ३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत़ गत तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद व महापालिका हद्दीतील ४ हजार ४१४ रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आले़ त्यामध्ये ३९८ संशयितांना त्वरित टॅमी फ्लूची औषधे देण्यात आली़ जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत २१ नागरिकांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे़ शनिवारी मृत्युमुखी पडलेल्या व खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाळासाहेब जाधव यांचा तपासणी अहवाल अद्याप जिल्हा रुग्णालयास मिळालेला नाही़ (प्रतिनिधी)‘इन्फल्युएंझा ए किंवा बी’ नामक वायरसमुळे जेव्हा सर्दी-ताप-अंगदुखी अशी लक्षणं येतात तेव्हा त्या आजाराला वैद्यकीय परिभाषेत ‘फ्लू’ असं संबोधतात़ मुळात स्वाइन फ्लू हा श्वसनाचा आजार ‘इन्फल्युएंझा ए नामक’ वायरस श्वसनमार्गाच्या संपर्कात आल्यामुळे होतो. सर्वात प्रथम या वायरसचा प्रादुर्भाव २००९ साली मेक्सिको येथे आढळून आला.या वायरसच्या पृष्ठभागावर दोन महत्त्वाचे अँटिजिन्स असतात. अँटिजीन्स म्हणजे अँटिबॉडीज निर्माण करण्यासाठी रक्ताला उत्तेजित करणारा पदार्थ. यास सरफेस अँटीजन असे म्हणतात. .स्वाइन फ्लूची सुरुवातीची लक्षणे ही साध्या तापाप्रमाणेच असतात. मात्र तापाचे प्रमाण तसेच घशातील संसर्गाचे प्रमाण वाढले तर ओसेल्टामिव्हीर सुरू करता येईल. प्रत्येक वेळी चाचणी करण्याची तसेच त्याच्या निकालाची वाट पाहण्याऐवजी वेळीच उपचार करणे अधिक योग्य आहे. स्वाइन फ्लू आणि साध्या तापामधील फरक ओळखणे कठीण असल्याने काही वेळेला योग्य उपचाराविना रुग्णांची स्थिती गंभीर होते, असे निदर्शनास येते. मात्र स्वाइन फ्लूच्या चाचणीची वाट न पाहता लक्षणांवरून उपचार सुरू केले तर स्वाइन फ्लू हा प्राणघातक ठरणार नाही. या आजारावर आॅसेलटॅमीवीर व झानामीवीर ही औषधे गुणकारी आहेत.

विषाणू राहतात हवेत आठ तास जिवंत

स्वाइन फ्लूचे विषाणू हवेत आठ तास जिवंत राहू शकतो. या व्यक्तीच्या खोकण्याने, शिंकण्याने हवेत उडणाऱ्या तुषारातील विषाणू धूलिकणावेष्टीत स्वरूपात जिवंत राहतात. तसेच हे विषाणू खुर्ची, टेबलसारख्या ठिकाणीही जिवंत राहतात. या विषाणूंचा नाक, डोळे, तोंड यांसारख्या घाणेंद्रियांशी संपर्क आल्यास संक्रमण होते.