नाशिक : हायमास्ट पोलवरील वीजमीटरच चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शालिमार चौकात घडली आहे़ नाशिक महानगरपालिकेने शालिमार चौकातील इंदिरा गाधी पुतळ्यामागे हायमास्ट बसविलेला आहे़ या हायमास्टवर बसविण्यात आलेले तीन हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक मीटर (क्रमांक - ८२०५३८८१२७) सोमवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेले़ या प्रकरणी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता विलास गायकवाड यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}