पिंपळगावी बिंगो चालविणारे दोघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 01:32 IST2022-04-21T01:32:36+5:302022-04-21T01:32:59+5:30
ऑनलाइन जुगार खेळण्याची तरुणांमधील क्रेझ वाढत असून यामुळे जुगारात लाखो रुपये गमावून तरुणाई कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. येथील ऑनलाइन जुगार चालविणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे

पिंपळगावी बिंगो चालविणारे दोघे गजाआड
पिंपळगाव बसवंत : ऑनलाइन जुगार खेळण्याची तरुणांमधील क्रेझ वाढत असून यामुळे जुगारात लाखो रुपये गमावून तरुणाई कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. येथील ऑनलाइन जुगार चालविणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव बसवंत येथील संशयित आरोपी प्रीतम राजेंद्र गोसावी (२६, रा. गोसावीवाडा पिंपळगाव बसवंत) आणि कैलास जोगेंद्रप्रसाद शहा (३२, रा. चिंतामणी अपार्टमेंट निर्मला कॉन्व्हेंटजवळ गंगापूररोड, नाशिक) हे दोघे संगनमत करून तरुणांना ऑनलाईन बिंगो रोलेट जुगार खेळवितात, त्यांनी फिर्यादी रामा रसाळ रा. पिंपळगाव बसवंत यास कमी वेळेत जास्त पैसे कमविण्याचे आमिष दाखवून त्यास बिंगो रोलेट जुगारामध्ये पैसे गुंतवल्यास जास्त पैसे मिळतील, असे आमिष दाखवून त्याचा विश्वास संपादन करून त्यास रोलेट बिंगोचा आयडी व पासवर्ड दिला आणि बिंगो रोलेट जुगारावर वेळोवेळी पैसे लावून जुगार खेळवून त्याची ४५ लाख ४४ हजार १३५ रुपयांची फसवणूक केली, म्हणून पिंपळगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी प्रीतम राजेंद्र गोसावी आणि कैलास जोगेंद्रप्रसाद शहा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय कवडे करीत आहेत.