कारे मेघा, कारे मेघा, पानी तो बरसाओ; नाशकात पावसासाठी शाळेने घेतली चक्क लगान क्रिकेट मॅच!

By संजय पाठक | Published: August 13, 2023 01:07 PM2023-08-13T13:07:35+5:302023-08-13T13:08:00+5:30

नाशिक मधील मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेच्या विद्या प्रबोधिनी प्रशाला सीबीएसईच्या वतीने दहावीतील विद्यार्थ्यांची ही मॅच घेण्यात आली आणि तीस वर्षांपूर्वीच्या लगान चित्रपटाप्रमाणे माहोल तयार झाला.

The school took a lagan cricket match for the rain in Nashik | कारे मेघा, कारे मेघा, पानी तो बरसाओ; नाशकात पावसासाठी शाळेने घेतली चक्क लगान क्रिकेट मॅच!

कारे मेघा, कारे मेघा, पानी तो बरसाओ; नाशकात पावसासाठी शाळेने घेतली चक्क लगान क्रिकेट मॅच!

googlenewsNext

नाशिक - यंदा वरुण राजा नाशिकवर कोपलाय. ऑगस्ट महिना निम्मा संपत आला तरी गोदावरी नदीला एकही पूर आलेला नाही, यावर देवी देवतांना साकडे घातले जात असताना नाशिक मधील एका शाळेने पाऊस पडण्यासाठी चक्क लगान मॅच घेतली.

नाशिक मधील मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेच्या विद्या प्रबोधिनी प्रशाला सीबीएसईच्या वतीने दहावीतील विद्यार्थ्यांची ही मॅच घेण्यात आली आणि तीस वर्षांपूर्वीच्या लगान चित्रपटाप्रमाणे माहोल तयार झाला. दुगना लगान देना पडेगा असे म्हणणाऱ्या ब्रिटिश हिरो आणि त्याची टीम आणि त्याच्या विरोधात लढणारी भुवन अर्थात अमीर खानची टीम असे सर्व खास वेशभूषेत आले. शिवाय क्रिकेट याच  करेक्टर नुसार खेळले. अर्थात क्रिकेट मॅच भुवन टीमने जिंकली. तसंच पावसासाठी प्रार्थना देखील केली. या खेळाडूंना क्रीडा शिक्षिका क्षितिजा खटावकर यांनी मार्गदर्शन केले. 

पावसासाठी अशा प्रकारचा उपक्रम चर्चेचा विषय ठरला.

Web Title: The school took a lagan cricket match for the rain in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.