टेम्पोच्या धडकेत बालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:29 IST2018-09-12T00:04:44+5:302018-09-12T00:29:57+5:30
भरधाव टेम्पोच्या धडकेत पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़ १०) दुपारच्या सुमारास एबीबी सर्कलजवळ घडली़ अबू दादा काळे (रा. दत्तमंदिर, टाकळी फाटा) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

टेम्पोच्या धडकेत बालक ठार
नाशिक : भरधाव टेम्पोच्या धडकेत पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़ १०) दुपारच्या सुमारास एबीबी सर्कलजवळ घडली़ अबू दादा काळे (रा. दत्तमंदिर, टाकळी फाटा) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारच्या सुमारास अबू याचे वडील सिग्नलवर फूल विक्री करीत होते़ यावेळी एबीबी सर्कलवर असलेल्या अबू यास सातपूरहून आलेल्या अज्ञात भरधाव टेम्पोने धडक दिली़ यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता मंगळवारी (दि़११) उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़
या प्रकरणी सातपूर पोलिसांनी अज्ञात टेम्पोचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.