चोरट्यांच्या रडारवर आता मंदिरे

By Admin | Updated: November 15, 2015 22:52 IST2015-11-15T22:51:39+5:302015-11-15T22:52:12+5:30

चोरीच्या घटना : दानपेटी, साहित्य चोरीस

Temples now on the radars of thieves | चोरट्यांच्या रडारवर आता मंदिरे

चोरट्यांच्या रडारवर आता मंदिरे

नाशिक : चोरट्यांनी आपला मोर्चा आता मंदिरांकडे वळविला असून, ध्रुवनगरमधील दोन मंदिरांमधील दानपेटी व साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे़
ध्रुवनगरमधील दक्षिणमुखी मारूती मंदिरातील दानपेटी शुक्रवारी (दि़ १३) रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेली़ या दानपेटीतील सुमारे पाचशे रुपयांची रोकड असल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ दरम्यान, या प्रकरणी विनोद काळे (३३, रा़मारुती मंदिराशेजारी, ध्रुवनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दुसऱ्या घटना ध्रुवेश्वर महादेव मंदिरात शनिवारी (दि़१४) दुपारच्या सुमारस घडली़
महादेव मंदिरातील शंकराच्या पिंडीवरील तांब्याची नागाची फणी चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित संतोष मोरे (राख़ालचा कोळीवाडा, शिवाजी चौक, सातपूर, नाशिक) यास गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ या प्रकरणी उत्तम अहेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांनी मोरेवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Temples now on the radars of thieves