शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

‘त्यांचा’ अंतीम प्रवास सुकर करण्यासाठी झटतोय सेवाव्रतींचा चमू !

By अझहर शेख | Published: June 25, 2020 5:19 PM

कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मनात न ठेवता निरपेक्ष भावनेने केवळ आपल्या समाजातील आपल्या व्यक्तीची अंतीम प्रवासात हेळसांड होऊ नये, म्हणून झटणाऱ्या या सेवकांच्या पाठीशी समाजाने भक्कमपणे उभे राहण्याची गरज

ठळक मुद्देएकूण ७० मृतदेहांचा दफनविधीएकूण ४८ व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला

अझहर शेख, नाशिक : शहर व परिसरात कोरोना आजाराने मृत्यू पावलेले व कोरोना संशयित म्हणून मृत्यू झालेल्या एकूण ७० मृतदेहांचा दफनविधी शहरातील विविध कब्रस्तानांमध्ये करण्यात आला आहे. यासाठी शहरातील काही बोटावर मोजण्याइतके सामाजिक कार्यक र्ते अहोरात्र परिश्रम घेत ‘त्यांचा’ अखेरचा प्रवास सुकर करण्यासाठी झटताना दिसत आहेत.मुस्लीमबहुल भागातील एकूण ४८ व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला आहे तर २२ कोरोना संशयित रूग्ण अद्याप दगावले आहेत. या सर्व मृतदेहांचा अखेरचा प्रवास सुकर करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांचा चमू झटत आहेत. आपल्या आरोग्याची कुठलीही तमा न बाळगता केवळ माणुसकीखातर समाजातील हे सेवाव्रती प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहेत. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मनात न ठेवता निरपेक्ष भावनेने केवळ आपल्या समाजातील आपल्या व्यक्तीची अंतीम प्रवासात हेळसांड होऊ नये, म्हणून झटणाऱ्या या सेवकांच्या पाठीशी समाजाने भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे; मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही, याऊलट या सेवकांनाही वेळेप्रसंगी टीकेचे धनी व्हावे लागत असल्याची शोकांतिका आहे.

...असा आहे सेवाव्रतींचा चमूसय्यद तुराब अली शाह बहुउद्देशीय संस्थेचे रिजवान नसीर खान यांनी मुस्लीम समाजाच्या दफनविधीसाठी लागणारे साहित्य पुरविण्याचा ठेका महापालिकेकडून घेतला आहे. रिजवान खान हे सुरूवातीपासूनच बेवारस मृतदेहांचे ‘वारस’ म्हणून शहर व परिसरात परिचित आहेत. कोरोना आजाराच्या या संकटकाळात रिजवान यांच्यासह सुरूवातीपासूनच मुस्लीम समाजाच्या मृत्यू नोंदीचे काम करणारे रफीक साबीर हेदेखील कोरोनाच्या रूग्णांचा मृतदेह दफनविधीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना मोलाची साथ मिळतेय जहांगीर कब्रस्तानात कबर खोदणारा युवक फिरोज शेख तसेच वडाळागावातील गौसिया कब्रस्तानांत कबर खोदणारे युवक रहिम व आसिफ यांची. ज्या कब्रस्तानात जेसीबी यंत्र सहजरित्या जाऊ शकते तेथे ना नफा ना तोटा या तत्वावर राजूभाईंकडून जेसीबी उपलब्ध करून दिले जात आहे. हे जेसीबी चालविण्यासाठी चालक म्हणून अशपाक शेख, गणेश आणि अमर हेदेखील तितकेच कष्ट उपसत आहेत. वडाळागावातील गौसिया कब्रस्तानात सध्यस्थितीत प्रत्येकी ७ फूट खोली असलेल्या २५ कबर जेसीबीद्वारे खोदण्यात आल्या आहेत. या सेवाव्रतींच्या सामाजिक व पुण्यकर्माला कुठेही अडथळा होऊ नये आणि दफनविधीचा खोळंबा होऊ नये, म्हणून हाजी रऊफ पटेल यांच्याकडूनही महत्त्वाची साथ लाभत आहेत. हायड्रोक्लोराईडसह सर्व सेवाव्रतींना मृतदेह दफनविधीदरम्यान लागणारा पीपीई सूट पटेल यांच्याकडून सातत्याने पुरविला जात आहे. 

टॅग्स :NashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMuslimमुस्लीम