शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
3
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
4
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
5
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
6
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
7
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
8
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
9
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
10
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
11
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
12
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
13
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
14
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
15
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
16
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
17
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
18
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
19
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
20
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी जातीयता निर्मूलन करावे

By admin | Updated: September 6, 2016 01:27 IST

सुधीर तांबे : काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने आदर्श शिक्षकांचा गुणगौरव

 नाशिक : देशात व राज्यात सध्या फोफावलेला भ्रष्टाचार, जातीयता व धर्मांधता नष्ट करण्याचे काम फक्त शिक्षकच करू शकतील, असे प्रतिपादन आमदार सुधीर तांबे यांनी केले. कॉँग्रेसच्या शिक्षक सेलच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. यंदा पहिल्यांदाच कॉँग्रेसच्या शिक्षक सेलच्या वतीने विविध शाळांमधील आदर्श शिक्षकांचा सत्कार कॉँग्रेस भवनात आयोजित करण्यात आला, त्यावेळी तांबे पुढे म्हणाले की, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी आपला जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. कारण देशात आदर्श नागरिक निर्माण करून त्यांना सुसंस्काराचे धडे देण्याचे कार्य शिक्षकच करू शकतो, याची त्यांना जाणिव होती, असेही तांबे म्हणाले. समाज शिक्षित करण्याची एकटी जबाबदारी शिक्षकांवरच असल्यामुळे समाजात शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही आदर्श म्हणूनच आहे. सध्या देशाला भेडसाविणाऱ्या साऱ्या समस्यांचे मूळ शिक्षण हेच असल्याने असे शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचा अभिमान बाळगणे साऱ्यांचेच कर्तव्य आहे. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, शहराध्यक्ष शरद अहेर, उद्धव पवार, अण्णा पाटील, वसंत ठाकूर, बबलू खैरे, शोभा भंदुरेआदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष व्ही. डी. निकम व शहराध्यक्ष बी. एन. ठाकरे यांनी केले. (प्रतिनिधी)