शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयास शिक्षकांनी ठोकले कुलूप ; प्रलंबित मागण्यासाठी आक्रमक भूमिका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 18:04 IST

मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी व तक्रारींसंदर्भात प्रलंबित मागण्यासाठी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व नाशिक जिल्हा टीडीएफ तसेच नाशिक जिल्हा शिक्षक परिषदेच्या पदाधिकारी व सभासदांनी गुरुवारी (दि.२०) माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाला कुलुप ठोकत आंदोलन केले.तसेच शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करीत त्यांच्या खुर्चीला शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन चिटकवून निषेध व्यक्त केला.

ठळक मुद्देमाध्यमिक शिक्षक संघटनांचे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवून व्यक्त केला निषेध जिल्हा परिषदेच्या माध्यमित शिक्षणाधिकारी कार्यालयाला ठोकले टाळे

नाशिक : जिल्ह्यातील मुख्याध्यापक शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी व तक्रारींसंदर्भात प्रलंबित मागण्यासाठी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व नाशिक जिल्हा टीडीएफ तसेच नाशिक जिल्हा शिक्षक परिषदेच्या पदाधिकारी व सभासदांनी गुरुवारी (दि.२०) माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाला कुलुप ठोकत आंदोलन केले.शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी विविध शिक्षक संघटांनी तीन दिवसांपूर्वीच माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार गुरुवारी जिल्हाभरातील पदाधिकारी शिक्षणाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. मात्र शिक्षणाधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क केला. शिक्षणाधिकारी बाहेरगावी असल्याने त्यांनी अधीक्षक सुधीर पगार व उपशिक्षणाधिकारी अनिल शहारे यांना शिक्षकांच्या प्रतिनिधी मंडळासोबत चर्चेसाठी पाठविले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेतन पथक कार्यालयाबद्दल तक्रारींचा पाढा वाचला, गेल्या अनेक वर्षापासून पुरवणी बीले कढली नसल्याची तक्रार केली. यावेळी वेतन पथक अधीक्षक उदय देवरे यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रकारचे मेडिकल बिले काढल्याचे सांगितले असता शिक्षकांनी प्रलंबित बीले पुरावे म्हणून सादर केले. दरम्यान, लॉकडाऊनकाळातही काही संस्थाचालक व मुख्याध्यापक शिक्षकांना शाळेत येण्याबाबत करीत अनुपस्थितांना कारणे दाखवा नोटिसा देत असल्याची तक्रारही शिक्षकांनी यावेळी मांडली. तसेच वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी व वैयक्तिक मान्यता, पदोन्नती, याबाबतही अधिकाऱ्यांना कोणतीही मुद्देसूद माहिती देता आले नाही, त्यामुळे शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांच्याविरोधात निषेध नोंदविण्यासाठी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करीत त्यांच्या खुर्चीला शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन चिटकवून कार्यालयाला अखेर कुलुप ठोकले. दरम्यान, अधीक्षक सुधीर पगार व शहारे यांनी गुरुवार (दि.२७) वेतन पथक अधीक्षक यांच्या समवेत बैठक घेऊन शिक्षकांच्या सोडविण्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात घेत शिक्षकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाचे कुलुप काढले . यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष साहेबराव कुटे, जिल्हा टीडीएफचे अध्यक्ष आर डी निकम, अनिल अहिरे, जयेश सावंत, शिक्षक परिषदेचे दत्ता पाटील, माध्यमिक शिक्षक संघटनेचे राज्य समन्वयक नीलेश ठाकूर, प्रदीप सिंग पाटील, त्र्यंबक मार्तंड, मनोहर देसाई, देशमुख अण्णा सचिन देशमुख, अशोक मार्तंड, सचिन शेवाळे, आशिष पवार, राजेंद्र शेळके डी आर पठाडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकzpजिल्हा परिषदTeacherशिक्षकSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र