ओझर : मतदार यादी दुरुस्ती नोंदणी मोहिमसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी गैरहजर आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील केशवानंद रमेश सौंदाणे (प्राथमिक शिक्षक) व यादी भाग क्रमांक ७३ मधील नेमण्यात आलेले बीएलओ. (ग्रामसेवक) एस.एम.कदम हे दिलेल्या मतदान केंद्र कक्षेत हजर नव्हते. त्यामूळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यामुळे निवडणूक कामात कसूर केल्याबद्दल मंडल अधिकारी शेख यांनी पंचनामा करून दोघांवर कारवाई केली. तसेच सदरचा प्रस्ताव निफाडचे तहसीलदार डॉ. संदीप अहेर यांच्याकडे पाठविला होता. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}