शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’च्या पर्यायी मार्गाची चर्चाच

By admin | Updated: April 30, 2017 02:26 IST

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी होणारा विरोध लक्षात घेता पर्यायी मार्गाने हा महामार्ग वळविण्याबाबत होत असलेली चर्चा शासकीय सूत्रांनी निरर्थक ठरविली

 नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जागा देण्यासाठी शेतकऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेता पर्यायी मार्गाने हा महामार्ग वळविण्याबाबत गेल्या दोन दिवसांपासून होत असलेली चर्चा शासकीय सूत्रांनी निरर्थक ठरविली असून, सध्याची परिस्थिती पाहता ज्या भागातील मोजणी पूर्ण झाली व जागा देण्यास शेतकऱ्यांनी सहमती दर्शविली अशा गावांमध्ये थेट जमीन खरेदीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिल्यामुळे महामार्ग प्रस्तावित मार्गानेच पुढे सरकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.७१० किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गासाठी जमिनीची मोजणी जवळजवळ पूर्ण झाली असून, वर्धा, औरंगाबाद, नगर व नाशिक या चार जिल्ह्णातील जेमतेम ५० ते ६० किलोमीटर जागेच्या मोजणीस जागा मालकांनी हरकत घेत, मोजणी करू देण्यास विरोध दर्शविला असल्याचे शासकीय सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून केलेली तयारी फलद्रूप दिसत असताना समृद्धी महामार्गात बदल होणे अशक्य मानले जात आहे. यासंदर्भात सोशल माध्यमातून होणारी चर्चा शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी किंवा सरकारवर दबाव टाकण्यासाठी होत असल्याची शंका बोलून दाखविली जात असून, उलट दोन दिवसांपूर्वीच मुंबई येथे रस्ते विकास महामंडळाची बैठक होऊन त्यात मोजणीच्या कामाचा आढावा घेऊन ज्या शेतकऱ्यांनी मोजणी करू दिली व जागा देण्यास सहमती दर्शविली अशा शेतकऱ्यांकडून थेट जागा खरेदीचे प्रस्ताव तयार करून ते सादर करण्याच्या सूचना राज्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. समृद्धी महामार्गासाठी शासनाने यापूर्वी लॅण्ड पुलिंगचा प्रस्ताव जागा मालकांसाठी ठेवला होता, परंतु त्यास शेतकरी राजी होत नसल्याने आता थेट खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून, त्यालाही प्रतिसाद न मिळाल्यास भूसंपादन कायद्यान्वये जागा संपादित करण्याचा पर्यायही शासनाने तयार ठेवला आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जागा मालकांची सहमती मिळाली तेथील जागा ताब्यात घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.