Swine Flu Crisis in Nashik along with Corona | नाशिकमध्ये कोरोनाबरोबरच स्वाईन फ्ल्युचे संकट

नाशिकमध्ये कोरोनाबरोबरच स्वाईन फ्ल्युचे संकट

ठळक मुद्देसहा रूग्ण आढळलेमनपाकडून उपाय योजना

नाशिक- कोरोनामुळे शहर धास्तावले असून कोणत्याही प्रकारची रोगराई वाढू नये यासाठी शासकिय यंत्रणांनी नागरीकांना सजग केले असताना आता शहरात स्वाईन फ्ल्यूचे संकट ओढोवले आहेत. आत्तापर्यंत सहा स्वाईन फ्ल्यूचे रूग्ण आढळले असून त्यात चार रूग्ण तर चालू महिन्यात पंधरा दिवसातच चार रूग्ण आढळले आहेत.

सध्या कोरोना मुळे नागरीकांत चिंतेचे वातावरण असून त्याचा संसर्ग लागू नये यासाठी शासकिय यंत्रणा अत्यंत निकराचे प्रयत्न करीत आहेत. तथापि, याच दरम्यान स्वाईन फ्ल्यूचे रूग्ण मात्र वाढु लागले आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी पर्यंत अवघे दोनच रूग्ण दाखल होते. मात्र, आता पंधरा दिवसात चार नवे रूग्ण दाखल असून त्यामुळे नागरीकांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते जून जुलै पर्यंत स्वाईन फ्ल्युचे दीडशे रूग्ण आढळले होते आणि त्यात दहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आॅगस्ट महिन्यापासून डेंग्यूचे रूग्ण वाढण्यास सुरूवात झाली. पावसाळा नोव्हेंबर पर्यंत लांबल्याने डेंग्यू रूग्णांची संख्याही वाढत गेली. डिसेंबर अखेर शहरात तीन हजार संशयित डेंग्यू रूग्ण तर एक हजार नागरीकांने डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. अर्थात, त्यात कोणाचा मृत्यू झाला नव्हता. परंतु स्वाईन फ्ल्यूमुळे दहा जणांचा मृत्यू झाला होता.

महापालिकेने कोरोनोबरोबरच स्वाईन फ्लू प्रतिबंधासाठी देखील उपाययोजना सुरू केल्या आहेत अशी माहिती आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. त्र्यंबके यांनी दिली.

Web Title: Swine Flu Crisis in Nashik along with Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.