शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जलतरण तलाव पूर्ववत सुरू

By admin | Updated: August 26, 2016 00:24 IST

महापालिकेचा निर्णय : पंचवटीचा १ सप्टेंबरपासून खुला

नाशिक : महापालिकेने शहरात १५ आॅगस्टपासून पाणीकपात संपूर्णपणे रद्द करून दोन वेळ पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतानाच पालिकेचे चार जलतरणतलाव दोन सत्रात पूर्ववत सुरूकेले आहेत. पंचवटी येथील जलतरणतलावाचे काम मुंबईतील एजन्सीला देण्यात आले असून, १ सप्टेंबरपासून श्रीकांत ठाकरे तरण तलावही कार्यान्वित होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता उत्तम पवार यांनी दिली.गंगापूर धरणातील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे महापालिकेने आपले पाचही जलतरणतलाव दि. २१ मार्च २०१६ पासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेने नाशिक पश्चिम विभागातील वीर सावरकर तरणतलाव, नाशिकरोड येथील राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय तरणतलाव, सिडकोतील स्वामी विवेकानंद तरणतलाव, सातपूर येथील क्लब हाउसमधील तरणतलाव आणि पंचवटीतील श्रीकांत ठाकरे तरणतलाव पूर्ण वेळ बंद ठेवले होते. महापालिकेने ९ आॅक्टोबर २०१५ पासून शहरात एकवेळ पाणीपुरवठ्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली, त्याचवेळी मनपाच्या पाचही तरणतलावांतील सायंकाळचे सत्र बंद करण्यात आले होते. केवळ सकाळचे तीन सत्र चालविले जात होते. त्यानंतर २२ फेबु्रवारीपासून विभागवार जलशुद्धीकरणनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने दर सोमवारी साप्ताहिक सुटीसह दोन दिवस तरणतलाव बंद ठेवण्यात येत होते. मात्र, धरणातील पाणीसाठ्यात होत चाललेली घट लक्षात घेता पूर्णवेळ तरणतलाव बंद ठेवण्याच्या सूचना जलसंपदामंत्र्यांनी केल्या होत्या. दरम्यान, गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने महापौरांनी दर गुरुवारी होणारी पाणीकपात रद्द करतानाच जलतरण तलावही खुले करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार, नाशिकरोड येथील राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय तरणतलाव, सिडकोतील स्वामी विवेकानंद तरणतलाव, सातपूर येथील क्लब हाउसमधील तरणतलाव २ आॅगस्टपासून खुले करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)