शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाचा संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: October 10, 2015 23:17 IST

नातेवाइकांची तक्रार : घातपाताचा संशय; पोलिसांनी मात्र केली अपघाताची नोंद

नाशिक : मखमलाबाद गावाच्या पुढे मनोली शिवारात रिक्षा उलटून क्रांतिनगरमधील रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़९) रात्रीच्या सुमारास घडली आहे़ मयत रिक्षाचालकाचे नाव नीलेश बळीराम गव्हाळ (३५) असे असून, त्यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे़ त्यानुसार जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदनात व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे़ दरम्यान, या अपघाताची तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नीलेश बळीराम गव्हाळ (३५, रा़ उदय कॉलनी, क्रांतिनगर, पंचवटी) हे रिक्षाचालक असून, मालेगाव स्टॅण्ड ते मखमलाबाद या पट्ट्यावर व्यवसाय करीत होते़ शनिवारी (दि़१०) सकाळी दरी-मातोरी शिवारातील मनोली घाटात त्यांची उलटलेली रिक्षा (एमएच १५, झेड ९०६२) व मृतदेह आढळून आल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी नाशिक तालुका पोलिसांना दिली़ त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला़ दरम्यान, हा अपघात नसून घातपात करून मृतदेह या ठिकाणी आणून टाकल्याने तसेच रिक्षाचा अपघात दाखविण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केल्याचा आरोप मयत नीलेशच्या कुटुंबीयांनी केला आहे़ तसेच रात्री साडेनऊ वाजता नीलेशसोबत मोबाइलवर बोलणे झाले होते़ तसेच मयत नीलेशचा मृतदेह आढळला मात्र त्याचा मोबाइल, पॉकेट मिळाले नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे़ मयत नीलेशच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण आहे़ शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून, त्यामुळे या रिक्षाचालकाचा मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)