शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मनसेच्या भूमिकेचा सस्पेन्स कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 1:19 AM

महापौरपदासाठी विरोधकांनी महाशिव आघाडीची तयारी केली असली तरी त्याला अद्याप मूर्तस्वरूप मिळालेले नाही. त्यातच मनसेने अद्याप शिवसेना की भाजप यांना पाठिंबा दिलेला नसून वेट अ‍ॅँड वॉच असे करीत बुधवार किंवा गुरुवारी भूमिका स्पष्ट करायचे ठरवले आहे.

नाशिक : महापौरपदासाठी विरोधकांनी महाशिव आघाडीची तयारी केली असली तरी त्याला अद्याप मूर्तस्वरूप मिळालेले नाही. त्यातच मनसेने अद्याप शिवसेना की भाजप यांना पाठिंबा दिलेला नसून वेट अ‍ॅँड वॉच असे करीत बुधवार किंवा गुरुवारी भूमिका स्पष्ट करायचे ठरवले आहे. त्यामुळे नाशिकवर विशेष लक्ष देणारे राज ठाकरे महाशिव आघाडीत सहभागी होऊन सेनेला पाठिंबा देतात की तटस्थ राहून अप्रत्यक्ष भाजपला साथ देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.भाजपचे बहुमत असले तरी या पक्षाला संभाव्य फाटाफुटीच्या चिंतेने ग्रासले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पथ्यावर हीच बाब पडली असून, त्यांनी सर्वच विरोधी पक्ष आणि अपक्षांची जुळवाजुळव सुरू केली आहे. या विरोधी पक्षांमध्येच महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचीदेखील भूमिका महत्त्वाची आहे. या पक्षाचे एकूण सहा नगरसेवक असून, स्थायी समितीत सत्तेत स्थान मिळावे यासाठी अपक्ष मुशीर सय्यद यांना मनसेने सामावून घेतल्याने एकूण सहा जणांचा गट आहे. मनसे या निवडणुकीत कोणाला साथ देणार असा प्रश्न असला तरी पक्षाने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. स्थानिक नगरसेवकात महाशिव आघाडीत स्थान देण्यावरून दुमत आहे. त्यामुळे रविवारी (दि. १७) राज ठाकरे यांच्याशी डॉ. प्रदीप पवार, अशोक मुर्तडक, अनंता सूर्यवंशी आणि सलीम शेख यांनी चर्चा केली. महापालिकेतील राजकीय स्थिती राज ठाकरे यांच्यासमोर स्पष्ट करण्यात आली असून, राज यांनी बुधवारी किंवा गुरुवारी निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. त्यामुळे महाआघाडीची जुळवाजुळव करण्यात अडचण झाली आहे. मनसेचे पाच नगरसेवक काय भूमिका घेतात यावर बराच निर्णय बदलू शकतो. त्यामुळे मनसे किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.दोन्ही संभाव्य निर्णयाचे पक्षादेश तयार?महापौरपदासाठी मनसेच्या वतीने दोन संभाव्य पक्षादेशदेखील तयार करून ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाच्या सध्याच्या गटनेता नंदिनी बोडके या असल्या तरी विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी करताना सलीम शेख हे गटनेता आहेत. त्यामुळे त्यांच्याही सहीचे पक्षादेश तयार करून ठेवण्यात आले आहेत. आता केवळ राज यांनी आदेश देताच त्यावर सह्या करून ते नगरसेवकांना बजावण्यात येणार आहेत.२०१२ मध्ये मनसेचे चाळीस नगरसेवक होते. त्यावेळी बहुमतासाठी भाजपने मनसेला पाठिंबा दिला होता. तर उत्तरार्धात कॉँग्रेस आणि राष्टÑवादीने पाठिंबा दिला होता. परंतु सेनेने मात्र विरोधाची भूमिका घेतली होती. मुंबई महापालिकेत तर त्यापेक्षा वेगळे राजकारण आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय निर्णय देतात याबाबत उत्सुकता आहे. विशेषत: राज ठाकरे यांना नाशिक महापालिकेत सर्वप्रथम सत्ता मिळाली होती. त्यानंतर आतादेखील दोन वर्षांनी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या असून, अशावेळी राज हे विचारपूर्वकच निर्णय घेतील, असे मनसेच्या वतीने सांगितले जात आहे.महापालिकेतील स्थितीबाबत राज ठाकरे यांना अवगत करण्यात आल्यानंतर ते बुधवारी किंवा गुरुवारी निर्णय देणार आहे. त्यांचा निर्णय काहीही असला तरी तो महापालिकेच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचा किंवा निर्णायक ठरू शकतो.- सलीम शेख,माजी गटनेता, मनसे

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूकMNSमनसेMayorमहापौर