शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

जमिनी संपादन अध्यादेशाला स्थगिती द्या : शरद पवार

By admin | Updated: July 30, 2016 01:38 IST

जमिनी संपादन अध्यादेशाला स्थगिती द्या : शरद पवार

सिन्नर : प्रस्तावित मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या अध्यादेशाला स्थगिती द्या, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली आहे. जमिनी संपादित करण्यापूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्या, घाई करू नका असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगणार असल्याचे पवार यांनी सांगितले. सिन्नर, इगतपुरी व कोपरगाव येथील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांनी संघर्ष समितीची स्थापना केली आहे. या संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी शरद पवार यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. त्यावेळी शेतकऱ्यांसोबत बोलतांना पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपण यासंबंधी मागणी करणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, सिन्नरचे तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष रवींद्र काकड, शहाजी पवार, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे, रामदास जायभावे, यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी मुंबई येथे जावून आमदार आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली पवार यांनी भेट घेतली. या महामार्गाची रुंदी किती, किती जमिनी संपादित कराव्या लागतील याबाबतची माहिती शासनाने द्यायला हवी होती असे सांगितले. ज्यांच्या जमिनी यापूर्वी विविध प्रकल्पासाठी संपादित केल्या आहेत पुन्हा पुन्हा त्यांच्या जमिनी संपादित करुन प्रश्न निर्माण करु नका असे पवार यावेळी म्हणाले. दहा वर्षापूर्वी या भागात असाच प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी संरक्षण विभाग व आम्ही बसून या प्रश्नावर मार्ग काढला होता असे पवार म्हणाले. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनी संपादित करण्यासाठी काढण्यात आलेला अध्यादेश मागे घ्यावा अशी मागणी पवार यांनी केली. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याच विषयावर बैठकीला जात निघालो असल्याचे ते म्हणाले. त्यांच्याकडेही आपण हीच मागणी करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. जेथे प्रकल्प होत आहे तेथील प्रमुख लोकांना एकत्र बसवा, त्यांच्यासोबत चर्चा करा. उगाच त्यांना विश्वासात न घेता जमिनींचे ताबे घेणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. त्यानंतर पवार हे मुख्यमंत्र्यासोबत बैठकीला निघून गेले. तत्पूर्वी संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास आपला विरोध असल्याचे पवार यांना सांगितले. जमिनी संपादित केल्यास आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी भितीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)