शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जानोरी ग्रामपंचायतीची स्मार्ट ग्राम समितीकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 01:08 IST

राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम योजना २०१९-२० या वर्षातील पुरस्कारासाठी पाहणी समितीने जानोरी ग्रामपंचायतीस भेट देऊन कामकाजाची पाहणी करत समाधान व्यक्त केले.

दिंडोरी : राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम योजना २०१९-२० या वर्षातील पुरस्कारासाठी पाहणी समितीने जानोरी ग्रामपंचायतीस भेट देऊन कामकाजाची पाहणी करत समाधान व्यक्त केले.सिन्नर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बी.के. बिन्नर, डी. जे. पवार, सूर्यवंशी आदींच्या समितीने दिंडोरी तालुक्यातील स्मार्ट ग्राम योजनेत भाग घेतलेल्या वणी, खेडगाव व जानोरी या गावांना भेटी देऊन तेथील कामांची पाहणी केली. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ग्रामस्थांचे वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांना दिल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षणविषयक सुविधा, प्लॅस्टिकबंदी, गावातील सौर दिवे, जलसंधारणाची कामे, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन आदी बाबींची या समिती सदस्यांनी पाहणी केली. जानोरी ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन दैनंदिन कामकाज, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली ग्रामपंचायतीचे संपूर्ण संगणीकृत कामकाजाची पाहणी केली.यावेळी सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, ग्रामविकास अधिकारी के.के. पवार यांनी समितीला सर्व योजनांची माहिती दिली. यावेळी दिंडोरी पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी जिभाऊ शेवाळे, विस्तार अधिकारी विजय शेवाळे, विस्तार अधिकारी यशपाल ठाकरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत