Surprisingly, the same goes for twin siblings | अहो आश्चर्यम्, जुळ्या भावंडांना दहावीच्या परीक्षेत मार्कही सारखेच

अहो आश्चर्यम्, जुळ्या भावंडांना दहावीच्या परीक्षेत मार्कही सारखेच

नाशिक : जुळ्या मुलांंचे स्वभाव आणि बरेच काही सारखंच असतं असे म्हणतात, नाशिकमध्ये दोन जुळ्या भावंडांना नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत मार्कही जुळेच म्हणजे सारखेच मिळाले आहे. या दुर्मीळ घटनेची ‘महाराष्टÑ बुक आॅफ रेकार्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे. शहरातील बॉइज टाऊन शाळेत जाणारे ओम आणि शिवानी बिरारी हे जुळे भावंडे. त्यांना दहावीच्या परीक्षेत ८२.२० टक्के गुण मिळाले आहे. त्यामुळे साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दहावीच्या परीक्षेत या दोघांना प्रत्येक विषयात मिळालेले गुण कमी अधिक असले तरी दोघांच्या गुणांची बेरीज मात्र ५०० पैकी ४४१ आल्याने दोघांना एकूण ८२.२० टक्के गुण मिळाले आहेत.

जुळ्या मुला-मुलींच्या बाबतीत अशाप्रकारे मार्कही जुळेच असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. ओम आणि शिवानी यांचा जन्म १ मे २००४ रोजीचा. दोघेही अभ्यासात हुशारच. अर्थात, ते जुळे भावंडं असले तरी एक मुलगा आणि एक मुलगी असल्याने त्यांच्या आवडी निवडी वेगवेगळ्या आहेत. अभ्यासातही ओमला गणित, तर शिवानीला जीवशास्त्र विषय आवडतो. त्यांचे वडील सुनील बिरारी सांगतात की, जुळे भावंडं असले तरी त्यांच्या आवडी-निवडी फार सारख्या नाहीत. त्यांची उंचीदेखील वेगळी आहे. मात्र, दोघेही अभ्यासू आहेत. ओमला संरक्षण क्षेत्रात जायचे असून, शिवानीला मात्र वैद्यकीय क्षेत्राकडे कल आहे.

Web Title: Surprisingly, the same goes for twin siblings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.