शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

येवला उपनगराध्यक्षपदी सूरज पटणी

By admin | Updated: December 30, 2016 23:20 IST

बिनविरोध निवड : अजय जैन, रूपेश दराडे आणि राजेंद्र लोणारी स्वीकृत सदस्य

येवला : पालिका राजकारणात अनिष्ठ प्रथेला थारा मिळू नये, घोडेबाजार थांबवा आणि सकारात्मक विधायक विकासाची भूमिका घेत राष्ट्रवादीने भाजपाला साथ देण्याची भूमिका घेतल्याने पालिकेच्या उपनगराध्यक्ष-पदी शिवसेनेचे सूरज जगदीश पटणी यांची बिनविरोध निवड झाली आणि पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या तीन जागांवर राष्ट्रवादीचे अजय जैन, भाजपाचे रूपेश दराडे, शिवसेनेचे राजेंद्र लोणारी यांची नियुक्ती झाली.  येवला पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आणि उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदाच्या नियुक्त्या अगदी चुरशीच्या होतील, अशी चर्चा होती; परंतु राष्ट्रवादीने अपक्षांना धडा शिकवण्याची भूमिका घेऊन भाजपा -सेनेला साथ केल्याने निवडी बिनविरोध झाल्या. येवला पालिकेत शुक्रवारी सकाळी ११ वाजता सुरू झाली. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे नेते माणिकराव शिंदे यांनी अपक्षांच्या छळाची सद्दी आणि मनमानी संपवणे आणि चालू असलेला विकास असाच पुढे नेण्यासाठी भाजपाला साथ करण्याची राष्ट्रावादीची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. येथेच सभेचा टोन बदलला आणि बिनविरोध निवडी निश्चित झाल्या. दरम्यान दुपारी १२ वाजता वंदे मातरमने सभेला सुरु वात झाली. प्रास्ताविकात मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी विकासकामासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य आहेच, असे सांगून सभेची सूत्रे पीठासन अधिकारी नूतन नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्याकडे सुपूर्द केली. प्रथम उपनगराध्यक्ष पदासाठी दाखल चार उमेदवारी अर्जांची छाननी झाली. यात शिवसेनेच्या वतीने सूरज पटणी, दयानंद जावळे, भाजपाच्या वतीने प्रमोद सस्कर व अपक्षांच्या वतीने सौ. पद्मा शिंदे यांचे चार अर्ज मंजूर असल्याचे सभागृहाला सांगून उमेदवारी अर्जाच्या माघारीसाठी १५ मिनिटे देण्यात आली. राष्ट्रवादीने नगरसेवक निसार शेख यांच्या उपनगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसंदर्भात घोषणा करून रा.कॉँॅ.च्या दहा नगरसेवकांना व्हीपदेखील बजावला होता. परंतु राष्ट्रवादीने उपनगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उमेदवारच उतरवला नाही. आणि भाजपा-सेना युतीला साथ देण्याची भूमिका सभागृहात घेतली. दरम्यान, गटागटाचे गुप्तगूदेखील झाले. निर्धारित वेळेत पद्मा शिंदे, दयानंद जावळे आणि प्रमोद सस्कर यांनी क्र मश आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. आणि केवळ शिवसेनेचे सूरज पटणी यांचा एकमेव अर्ज उपनगराध्यक्ष पदासाठी शिल्लक राहिल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा पीठासन अधिकारी यांनी केली. या निवडीनंतर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष म्हणून सूरज पटणी यांना सन्मानाने आसनस्थ केले. यानंतर पालिका सभागृहातील पक्षीय बलाबल आणि स्वीकृत नगरसेवक निवडीची कार्यपद्धती पालिकेचे ज्येष्ठ लिपिक बापू मांडवाडकर यांनी सभागृहाला सांगितली. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेचे राजेंद्र लोणारी, भाजपाचे रूपेश दराडे, तर राष्ट्रवादीच्या वतीने अजय जैन, पंकज पारख, सुनील काबरा, हुसेन शेख यांचे उमेदवारी अर्ज दाखल असल्याची माहिती दिली. शहर विकास आघाडीचे योगेश पाटील यांनी दाखल केलेला अर्ज नामंजूर झाल्याचे सांगितले. राष्ट्रवादीच्या वतीने स्वीकृत सदस्य पदासाठी चार अर्ज दाखल असल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेस गटनेते डॉ. संकेत शिंदे यांनी अजय जैन यांच्या नावाचे घोषणापत्र पीठासन अधिकाऱ्याला सादर केल्याने जैन यांची निवड झाली. तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेचे राजेंद्र लोणारी व भाजपाचे रूपेश दराडे यांचा दोन्ही गटाकडून प्रत्येकी एक नावाची शिफारस असल्याने त्यांच्या नियुक्तीची घोषणा झाली. यावेळी सभागृहात नगरसेवक डॉ. संकेत शिंदे, शेख परवीन बानो निसार, शेख तेहसीन अ. रज्जाक, शेख निसार, मोमीन सबिया अ सलीम, शेख रईसा बानो शेख, सचिन शिंदे, शीतल शिंदे, प्रवीण बनकर, नीता परदेशी, पुष्पा गायकवाड, छाया देसाई, प्रमोद सस्कर, पद्मा शिंदे, गणेश शिंदे, छाया क्षीरसागर, रूपेश लोणारी, दयानंद जावळे, किरण जावळे, सरोजिनी वाखारे, शफिक शेख, सचिन मोरे, अमजद शेख उपस्थित होते. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली. पालिका सभेचे नियोजन करण्यासाठी मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बापू मांडवडकर, अशोक कोकाटे, शिवशंकर सदावर्ते, सुभाष निकम, सोमनाथ भुरक, प्रवीण नागपुरे उपस्थित होते. (वार्ताहर)