शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

शेळ्या पाळणारी सुमनबाई बनली मोहेगावची कारभारीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 00:47 IST

नांदगाव : महिनाभर सुरू असलेली ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम संपली आणि सरपंचपदाची लगबग सुरू झाली. आरक्षण पडले आणि 'तिचे' नशीब फळफळले. लोकशाहीचे फळ मोहेगावच्या सुमनबाईपुढे अलगद येऊन पडले. अनुसूचित जातीसाठी राखीव सरपंचपदाचा अनपेक्षित लाभ पदरी पडल्याने शेळी पालन करणारी व प्रसंगी शेतावर मजुरी करणारी महिला सुमनबाई आनंदित झाल्या. पाटलाची सून नसली तरी, मोहेगावची प्रथम नागरिक होण्याचा मान तिला मिळाला.

ठळक मुद्देनशीब फळफळले : सरपंचपदासाठी अंगठा बनला सर्वशक्तिमान

अनुसूचित जातीसाठी राखीव झालेल्या सरपंचपदाची चिठ्ठी निघाली. तेव्हा या पदावर एकमेव दावेदार असलेली सुमनबाई मात्र आपल्या झोपडी समोरच्या गोठ्यात शेळीचे दूध काढत होती. तिचे माहेर नांदगाव तालुक्यातल्या भौरी गावाचे. माहेरी असताना रानात शेळ्या चारायला जायची आणि सासरीसुद्धा तसेच जीवन वाट्याला आले. परिस्थितीमुळे चार बुकंही शिकू न शकलेली 'ती' निरक्षरच राहिली. सरपंचपदाच्या सहीचा अधिकार.... होय... सरपंचपदाचा अंगठा तिच्या नशिबाने तिला मिळाला.आपल्याला गावचे सर्वात मोठे पद मिळाले, याची तिला जाणीव आहे. गावाचा विकास कसा करायचा, याचे मोठे ज्ञान नसले तरी, आपल्या आदिवासी वस्तीत रस्ते, गटारी झाल्या पाहिजेत, दिवाबत्ती पेटली पाहिजे, असे तिला वाटते.गाव विकासाची तळमळविकासाच्या नावाने बोट मोडता-मोडता आरक्षणामुळे अंगठ्याचा ठसा किती महत्त्वाचा झाला आहे, याची जाणीव तिला झाली असली, तरी तिच्या अंगठ्याच्या जोरावर सत्तेत आलेल्या मंडळींनी गावचा विकास करावा, असे तिला वाटले, तर ते वावगे ठरू नये. गाव विकासाची तळमळ तिच्या प्रत्येक शब्दांतून व्यक्त होते. एकलव्याला आदर्श मानून त्याची पूजा करणारी सुमनबाई व तिची जातकुळी. गुरुदक्षिणेपोटी अंगठा गमवावा लागणाऱ्या एकलव्याची वेळ तिच्यावर येऊ नये. गावच्या विकासासाठी तिचा अंगठा उमटला जावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत