शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी चारा सुकला

By admin | Updated: April 30, 2017 23:14 IST

बेलगाव कुऱ्हे : भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत जात आहे. सलगच्या दुष्काळी स्थितीमुळे शेती वाचविणे शेतकऱ्यांपुढे मोठे अवघड होऊन बसले आहे.

 बेलगाव कुऱ्हे : सूर्य आग ओकत असून, भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात खालावत जात आहे. सलगच्या दुष्काळी स्थितीमुळे शेती वाचविणे शेतकऱ्यांपुढे मोठे अवघड होऊन बसले आहे. उन्हाच्या कडाक्यापासून शेतातील उभे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे; मात्र त्यातही त्यांना अपयश येत आहे. परिसरातील काही शेतकऱ्यांनी यावर्षी बागायती शेती केली; मात्र पाण्याची कमतरता असल्याने फळे सुकून गेली आहेत. पाणी न मिळाल्याने डाळिंब फळाची फुगवन झाली नाही. यातही आर्थिक फटका बसणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पारंपरिक शेतकरी व व्यवसायिक दुष्काळाच्या गर्तेत सापडले आहेत. दोन-तीन वर्षांपासून पावसाने शेतकऱ्यांना हवी तशी साथ दिली नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे. डोक्यावरील कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांचा स्वस्तही बसू देत नाही अशा स्थितीत जगावे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मेहनतीने उभी केलेली पिके डोळ्यांदेखत पाण्याअभावी नष्ट होताना पाहावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी विकत पाणी घेऊन शेती वाचविण्याचा प्रयत्न केला आहे; निसर्गाने यातही त्यांची थटा केली. उन्हाचा तडाका वाढण्याने सर्वत्र पिण्याच्या पाण्याची दाहकता निर्माण झाली आहे. सकाळी १० वाजेनंतरच परिसरातील रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहे. यामुळे छोट्या- मोठ्या व्यवसायांवरदेखील उन्हाच्या दाहकतेचा परिणाम झाला आहे. तालुक्याच्या पूर्वभागात शेतीला पूरक असा दुग्धव्यवसाय केला जातो. मात्र चारा-पाण्याच्या टंचाईमुळे तोही संकटात आला आहे. परिसरातून हजारो लिटर दुधाचे संकलन केले जाते. मात्र सद्यस्थितीत दुधामध्ये मोठी घट निर्माण झाली आहे. उन्हाचा दाहकतेमुळे जनतेची लाही लाही होते. तसा मुक्या जनावरांनादेखील उन्हाचा त्रास होत आहे. पाणी व चारा नसल्याने दुधाळ जनावरे दूध देत नाहीत. यामुळे दुग्धव्यवसाय करणारेही संकटात सापडले आहेत. इगतपुरी तालुक्याची दुष्काळाची दाहकता दिवसागणिक वाढतच आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील छोटी-मोठी धरणे, नदीपात्र कोरडी पडली आहेत. धरणांच्या तालुक्याला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदीचे चित्र निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील गावांची पाण्याची परिस्थिती चिंताजनक आहे. अशा स्थितीत गोधन वाचविणे कठीण होऊन बसले आहेत. जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांपुढे पशुधन वाचविणे मोठे आव्हान आहे. इगतपुरी तालुक्याची निसर्गसौंदर्याने परिपूर्णतेची ओळख इतर जिल्ह्यात असल्याने परजिल्ह्यांतून मेंढपाळांचे येथे स्थलांतर झाले आहे. मात्र त्यांनाही यावर्षी पिण्याचे पाणी मिळेनासे झाले आहे. (वार्ताहर)