हरणूल शिवारात टँकरला अचानक आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2022 00:28 IST2022-01-09T00:23:46+5:302022-01-09T00:28:34+5:30
चांदवड : तालुक्यातील हरणूल शिवारात मनमाड-चांदवड रोडवर शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जुन्या टोलनाक्याजवळ इंडियन ऑइल कंपनीच्या टँकरला अचानक ...

हरणूल शिवारात टँकरला अचानक आग
चांदवड : तालुक्यातील हरणूल शिवारात मनमाड-चांदवड रोडवर शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जुन्या टोलनाक्याजवळ इंडियन ऑइल कंपनीच्या टँकरला अचानक आग लागली. मनमाडकडून चांदवडकडे जाणारा इंडियन ऑइलचा टँकर (क्रमांक एम एच ४६ / ०१ /१६५६) ला तेल भरून जात असताना अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच परिसरातील शेतकरी राजाराम निकम, बाबाजी निकम, विलास गांगुर्डे, अशोक निकम, हरीश वानखेडे, भूषण निकम आदींनी शर्थीचे प्रयत्न करून पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सोमा टोल कंपनीच्या अग्निशामक दल व पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.