शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कळवण बसस्थानकावर विद्यार्थी असुरक्षित

By admin | Updated: August 24, 2016 22:20 IST

गैरसोय : शाळा-महाविद्यालये सुटल्यानंतरही वेळेत बसेसअभावी वेळेचा अपव्ययं

 मनोज देवरे ल्ल कळवणस्थळ : कळवण बसस्थानकवेळ : दुपारी १२ वाजताबसस्थानकावर सकाळी शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची सुट्टी झाल्यानंतर गावाकडे जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमध्ये जागा मिळावी म्हणून विद्यार्थी व विद्यार्थिनी दप्तरासह इतर वस्तू टाकतात, तर काही विद्यार्थी खिडकीतून प्रवेश करतात. गर्दीच्या या वेळेत दुचाकीस्वार या परिसरात घिरट्या घालून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. हा सर्व प्रकार बघूनदेखील सरकारी यंत्रणाच काय; पण उपस्थित असलेली पोलीस यंत्रणादेखील बघ्याची भूमिका घेत असल्याने शहरात शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी कळवण बसस्थानकावर सुरक्षेत नापास ठरले आहेत.तालुक्यातून सवलतीच्या अहल्याबाई होळकर योजना व मानव विकास योजनेंतर्गत हजारो पासधारक विद्यार्थिनी शिक्षणासाठी शहरात येतात. तसेच तालुक्यातून हजारो पासधारक विद्यार्थी शहरातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी सकाळी ७ वाजेपासून शहरात येतात. एकूणच हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना बसस्थानकावर सुरक्षा देणे गरजेचे असताना मात्र, कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून, यासंदर्भात बसस्थानकावर घडलेल्या या प्रकाराबाबत घटनास्थळी आखो देखा हाल पहाणऱ्या एका पोलिसाला उपस्थितांनी टोकले असता त्यांनी घटनेकडे दुर्लक्ष करणे पसंत करून आपली जबाबदारी नसल्याचे दाखवून दिल्याने या विद्यार्थी व विद्यार्थिनींना आता सुरक्षा कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बसस्थानकात विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाच्या दोन महिला पोलीस कर्मचारी सकाळी व दुपारी तैनात करण्याची गरज आहे. शिवाय कळवण बसस्थानकावर दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची गावाकडे जाण्यासाठी एकच गर्दी होत असल्याने या काळात कळवण पोलीस स्टेशनचे अधिक पोलीस कर्मचारी नियुक्त करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनींचा बस पकडण्याच्या आततायीपणावर नियंत्रण येणार आहे.शहरातील विविध शाळांमधून दुपारी १२ व ५ वाजेनंतर बाहेर पडणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. या विद्यार्थ्यांकडे न पाहताच वाहनधारक जोरात वाहने हाकत असल्याने अपघातांचा धोका आहे. शाळा, महाविद्यालय परिसरातील रस्त्यावर उपाययोजनांची गरज आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी पालकांनी केली आहे. (वार्ताहर)