शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी वाहतूक नाशिक पॅटर्न राबविणार

By admin | Updated: July 17, 2017 00:31 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग व महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या विद्यार्थी वाहतूक विभागाच्या प्रयत्नातून नाशकात सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीचे जाळे निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना होणारे अपघात तसेच आगीच्या घटनांना गांभीर्याने घेत महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग व महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या विद्यार्थी वाहतूक विभागाच्या प्रयत्नातून नाशकात सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीचे जाळे निर्माण झाले आहे. राज्यभरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अशाच प्रकारची वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी परिवहन विभाग यंत्रणा राबविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले.  महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग व महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या विद्यार्थी वाहतूक विभागाच्या प्रयत्नातून सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी सुमारे ९०० वाहतूकदारांचे परवाने तयार झाले असून, वाहतूक सेनेच्या विद्यार्थी शाखेतर्फे मेळाव्यात यातील ११ वाहनधारकांना रावते यांच्या हस्ते रविवारी प्रातिनिधिक स्वरूपात परवान्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी रावते यांनी सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीचा हा नाशिक पॅटर्न राज्यभर राबविण्याची गरज असून,  परिवहन विभाग राज्यभरात अशाप्रकारची वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले. व्यासपीठावर माजीमंत्री बबन घोलप, शिवसेनेचे उपनेते अल्ताफ शेख, वाहतूक सेनाप्रमुख उदय दळवी, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, आमदार योगेश घोलप, देवानंद बिरारी, अजिज सय्यद आदि उपस्थित होते. रावते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड होऊ शकत नाही. परंतु, अशी सुरक्षित वाहतूक व्यवस्था सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही. त्यामुळे नाशिक परिवहन विभाग व वाहतूक सेनेने एकत्रित प्रयत्नातून सुरक्षित व स्वस्त विद्यार्थी वाहतुकीचा आदर्श निर्माण केला आहे. राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये अशी व्यवस्था निर्माण होण्याची गरज आहे. राज्यात सध्या केवळ ३० हजार परवानाधारक विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने असून, संपूर्ण राज्यभरात तीन लाख परवानाधारक विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची गरज आहे. त्यामुळे राज्यभरात नाशिकप्रमाणे विद्यार्थी वाहतूक वाहनांना परवाने उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन विभाग प्रयत्नशील असल्याचे दिवाकर रावते यांनी सांगितले. त्याचबरोबर परवाने मिळविण्यासाठी गैरप्रकारांना प्रोत्साहन देणेही वाहनधारक ांनी बंद करावे. दरम्यान, विद्यार्थी वाहतूक परवाने तयार करण्यासाठी सहकार्य करणारे परिवहन विभागाचे अधिकारी राजेंद्र कदम व भरत कळसकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.