वणी परिसरात दमदार हजेरी

By Admin | Updated: July 3, 2016 23:58 IST2016-07-03T22:50:19+5:302016-07-03T23:58:11+5:30

वणी परिसरात दमदार हजेरी

Strong presence in Wani area | वणी परिसरात दमदार हजेरी

वणी परिसरात दमदार हजेरी

 वणी : परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. तूर, उडीद, मूग, भुईमूग अशा पिकांच्या पेरणीच्या कामास पोषक व अनुकूल स्थिती निर्माण झाली असून, टमाटा लागवडीसाठी हा पाऊस उपयुक्त मानला जात आहे. परिसरात अवणीभात, सोयाबीन पेरणी या कामांना आता वेग येणार आहे. याबरोबर ज्या टमाटा उत्पादकांनी लागवड यापूर्वीच उपलब्ध पाणीसाठ्यावर केली आहे त्यांनाही हा पाऊस पोषक आहे. या पावसामुळे नद्या, नाले, विहिरी, पाझर तलाव, धरणसाठा यांच्या पातळीत वाढ झाली नसली तरी खरीप पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरीवर्ग जोमाने कामास लागला आहे. दरम्यान, दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, द्राक्षबागांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)

Web Title: Strong presence in Wani area