सातपूरला रास्ता रोको

By Admin | Updated: January 31, 2016 00:07 IST2016-01-31T00:05:33+5:302016-01-31T00:07:48+5:30

सातपूरला रास्ता रोको

Stop the road to Satpur | सातपूरला रास्ता रोको

सातपूरला रास्ता रोको

सातपूर : येथील प्रभाग क्रमांक १७ मधील कायदा सुव्यवस्था सुरळीत व्हावी आणि महापालिकेकडून नागरिकांना सुविधा मिळाव्यात, या मागणीसाठी शिवाजीनगर कार्बन नाका येथे नगरसेवक दिनकर पाटील आणि नगरसेवक लता पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
महापालिका आणि पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमृत पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक दिनकर पाटील यांनी ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. याप्रसंगी अमोल पाटील, राजाराम पाटील, दिनकर कांडेकर, दिलीप घोटेकर, दशरथ गुरगुडे, संतोष तिवारी, वाल्मीक रणशूर, लियाकत शेख, संजू तांबे, वाल्मीक पाठक, डॉ. बागुल, सदानंद नाईकवाडी, के. डी. कांबळे, संजय ठुबे, बबलू शेख, राजू अनावट, गणेश जामदार, कल्पना गंगावने, आशा आरणे, हिराबाई चव्हाण, मनोज शिंदे आदिंसह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Stop the road to Satpur