शेतीत पाणी घुसल्याने संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 10:38 PM2019-11-02T22:38:41+5:302019-11-02T22:44:13+5:30

निफाड : नाशिक - औरंगाबाद मार्गावरील शिवरे फाट्याजवळ बुजवलेला फरशी पूल तातडीने खोदून स्वच्छ करावा यासाठी श्रीरामनगर, रामपूर, सोनेवाडी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले. त्याचक्षणी जेसीबीच्या साहाय्याने पूल खोदून मोकळाकरण्यात येऊन तुंबलेल्या पाण्याला वाट काढून दिल्याने वाहतूक सुरळीत झाली तसेच शेतीतील पाण्याचाही निचरा झाला.

Stop the path of the agitated farmers as water enters the fields | शेतीत पाणी घुसल्याने संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

शिवरे फाटा येते रास्ता रोकोप्रसंगी तहसीलदार दीपक पाटील यांच्याशी चर्चा करताना आमदार दिलीप बनकर, राजेंद्र डोखळे, लासलगाव कृउबाचे संचालक सुभाष कराड, राजेंद्र बोरगुडे आदी.

Next
ठळक मुद्देनाशिक - औरंगाबाद महामार्गावर शिवरे फाट्याजवळ फरशी पुलावर पाणी;पाटबंधारे विभागाने तातडीने काम केल्याने रस्ता खुला

निफाड : नाशिक - औरंगाबाद मार्गावरील शिवरे फाट्याजवळ बुजवलेला फरशी पूल तातडीने खोदून स्वच्छ करावा यासाठी श्रीरामनगर, रामपूर, सोनेवाडी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले. त्याचक्षणी जेसीबीच्या साहाय्याने पूल खोदून मोकळाकरण्यात येऊन तुंबलेल्या पाण्याला वाट काढून दिल्याने वाहतूक सुरळीत झाली तसेच शेतीतील पाण्याचाही निचरा झाला.
तालुक्यातील श्रीरामनगर, रामपूर, सोनेवाडी परिसरातून वेगाने वाहून येणारे पावसाचे पाणी वाहून जावे म्हणून रस्ता तयार करताना शिवरे फाट्याजवळ फरशी पूल करत आला होता.
मात्र काही वर्षांपूर्वी कोणीतरी सदर पूल माती टाकून बुजविल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात महामार्गावर साचून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वाढले होते. सदर पूल खुला करावा याबाबत मागणी करण्यात येत होती, मात्र दखल घेतली जात नव्हती. अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागावा म्हणून नुकसानग्रस्त शेतकºयांनी शिवरे फाटा येथे सकाळी ११ वाजता रास्ता रोको केला. ही माहिती मिळताच आमदार दिलीप बनकर, तहसीलदार दीपक पाटील व इतर अधिकाºयांनी तातडीने धाव घेत, शेतकºयांच्या भावना लक्षात घेऊन तहसीलदार पाटील यांनी बांधकाम विभागाला सूचना दिल्या.वाहतुक ठप्प
गत १५ दिवसांपासून या रस्त्यावर प्रचंड पाणी साचून वाहतूक ठप्प होण्याबरोबरच परिसरातील शेतीत पाणी घुसून पिकांचे नुकसान होत होते. शनिवारी मोठ्या स्वरूपात पाऊस झाल्याने येथे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांचा संताप झाला. प्रशासकीय अधिकाºयांनी तातडीने जेसीबी मशीन बोलावून घेत या फरशी पुलामधील (मोरी) दगड, माती बाहेर काढून रस्त्याच्या बाजूला व शेतीत तुंबलेले पाणी वेगाने वाहून वाहतूक सुरळीत झाली. तसेच शेतीत साचलेले पाणीही कमी झाले.

Web Title: Stop the path of the agitated farmers as water enters the fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.