इगतपुरी येथील चोरी गेलेल्या वस्तू सापडल्या

By Admin | Updated: January 5, 2015 01:10 IST2015-01-05T01:04:32+5:302015-01-05T01:10:53+5:30

इगतपुरी येथील चोरी गेलेल्या वस्तू सापडल्या

The stolen items were found in Igatpuri | इगतपुरी येथील चोरी गेलेल्या वस्तू सापडल्या

इगतपुरी येथील चोरी गेलेल्या वस्तू सापडल्या

इगतपुरी : शहरात कृष्णकुंज बंगल्यात धाडसी चोरी झाली होती. मात्र आज येथील आठचाळ परिसरातील सप्तशृंंगी मंदिराजवळ जुन्या पडक्या घराजवळील आवारात चोरलेले सोन्याचे पॅन्डल, पेटी, रिकामी पर्स फेकलेल्या आवस्थेत आढळून आले.
येथील शहरातील नेहरू चौक तीतलकडी परिसरातील जगदीश मंत्री यांच्या कृष्णकुंज बंगल्याची चोरी झाली होती. मात्र येथील आठचाळ परिसरातील सप्तशृंगी मंदिराजवळील पडक्या घराजवळ संदीप पाटणे नामक तरुणाला सशंयास्पद वस्तू दिसल्याने त्याने लगेच पोलीस स्थानकात भ्रमणध्वनी करून कळविले, तेव्हा पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. तेथे फेकलेल्या वस्तू आढळून आल्या. तत्काळ पोलिसांनी येथे श्वान पथकाने येथील मुंबई-आग्रा महामार्गाकडे जावुन मार्ग काढला. या मुळे श्वान पथक फिरल्याने चोरांचा सुगाव लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: The stolen items were found in Igatpuri