सेंट लॉरेन्स क्रिकेट संघाची राज्यस्तरावर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:53 IST2019-11-09T23:15:26+5:302019-11-10T00:53:55+5:30

विभागीय क्रिकेट सामन्यात कळवण येथील संघाला नमवून सेंट लॉरेन्स संघाने विजय मिळवित संघाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. या विजयामुळे सेंट लॉरेन्स शाळेचा संघ चौऱ्यांना राज्यस्तरावर निवड झाली असून, यामुळे लॉरेन्स शाळेच्या यशात आणखी एक भर पडली आहे.

State Lawrence selection of St. Lawrence Cricket Team | सेंट लॉरेन्स क्रिकेट संघाची राज्यस्तरावर निवड

सेंट लॉरेन्स क्रिकेट संघाची राज्यस्तरावर निवड

सिडको : विभागीय क्रिकेट सामन्यात कळवण येथील संघाला नमवून सेंट लॉरेन्स संघाने विजय मिळवित संघाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. या विजयामुळे सेंट लॉरेन्स शाळेचा संघ चौऱ्यांना राज्यस्तरावर निवड झाली असून, यामुळे लॉरेन्स शाळेच्या यशात आणखी एक भर पडली आहे.
नाशिक येथे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील अंतिम सामना हा सिडकोतील राजे संभाजी क्रीडा संकुल येथे घेण्यात आला. लॉरेन्स संघाने जिल्हास्तरावर सिम्बायसिस, निर्मला कॉन्व्हेन्ट, अशोका यूनिव्हर्सल, रॅन इंटरनॅशनल या संघाना पराभूत केले. यानंतर विभागीय स्तरावर अंतिम सामना हा सेंट लॉरेन्स संघ व कळवण येथील शरद पवार पब्लिक स्कूल यांच्या झाला. यावेळी संघात झाला. यात शरद पवार पब्लिक स्कूल संघ प्रथम फलंदाजी करीत असताना लॉरेन्स संघाने भेदक गोलंदाजी करीत शरद पवार पब्लिक स्कूल च्या संघाला १० षटकांत केवळ २९ धावा केल्या. यानंतर सेंट लॉरेन्स संघाने नऊ गडी राखत दणदणीत विजय संपादन केला. या विजयानंतर सेंट लॉरेन्स संघाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. सेंट लॉरेन्स संघाचे प्रशिक्षक म्हणून सर्वेश देशमुख यांनी कामगिरी बजावली. राज्यस्तरावरील स्पर्धा या नाशिक येथेच होणार असून, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी या स्पर्धा होणार असल्याचे सांगण्यात आले.
 

Web Title: State Lawrence selection of St. Lawrence Cricket Team