शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या प्रश्नावर राज्य सरकार अपयशी : विखे-पाटील

By admin | Updated: March 6, 2016 00:02 IST

दुष्काळाच्या प्रश्नावर राज्य सरकार अपयशी : विखे-पाटील

 मालेगाव : दुष्काळाच्या प्रश्नावर राज्य शासन अपयशी ठरले असून शासनाने त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या वाढत असल्याने कर्जमाफीशिवाय पर्याय नाही. शासनाने सभागृहात कर्जमाफीची घोषणा केली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.हजारखोलीतील शहर काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विखे-पाटील बोलत होते. समवेत आमदार आसिफ शेख उपस्थित होते.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून अवर्षणाची परिस्थिती आहे. मनरेगाची कामे बंद आहेत. जनावरांच्या छावण्या लावण्यासाठी जाचक अटी लादल्या आहेत. शेतकरी आत्महत्या होत असताना शासन जुन्याच घोषणा करीत आहे. शेतकऱ्यांना शंभर टक्के वीज बिल माफ  करावे. शैक्षणिक शुल्कासह विद्यार्थ्यांना फी माफी मिळावी. मराठवाड्यात हजारो मुले शाळा सोडून घराकडे येत असल्याचे सांगून ९ तारखेच्या अधिवेशनात सरकार काय भूमिका घेते हे पाहू त्यानंतर आमची भूमिका मांडू. केंद्र व राज्याचा हेतू संशयास्पद वाटत असल्याचे सांगून ते म्हणाले, नागपूर अधिवेशन काळात घोषणा केल्या; मात्र प्रत्यक्ष विदर्भातील कापूस उत्पादकांना त्याचा फटका बसला. युती शासनाने गोवंश हत्या बंदीचा कायदा केल्याने शेतकरी जनावरे विकू शकत नाही. काँग्रेसने यापेक्षाही भयंकर दुष्काळाचा सामना केला आहे. युतीच्या २७ मत्र्यांनी मराठवाड्यात दौरा केला. हा फार्स करण्याऐवजी मुंबईत ही ते घोषणा करू शकले असते. अजून उन्हाळ्याचे चार महिने बाकी आहेत. पाऊस कधी पडेल सांगता येत नाही. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती सरकारच निर्माण करते. रोहित आमुलाबाबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणींमुळे सरकार उघडे पडले. देशात दंगे व्हावेत हीच सरकारची रणनिती असल्याचा आरोप त्यांनी केला.मालेगावात बेरोजगारांना नोकरी देण्याचे आमिष देवून लाखो रूपयांना गंडा घालण्याच्या प्रकारासंदर्भात अधिवेशनात प्रश्न मांडू. सीबीआय चौकशीची मागणी करु, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेवटी सांगितले. यावेळी काँग्रेसनेते प्रसाद हिरे आणि सुवर्णकार समाजातर्फे विखे-पाटलांना निवेद सादर करण्यात आले.