शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरणातून विसर्ग सुरू

By admin | Updated: July 17, 2017 00:26 IST

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्यांमधील धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्यांमधील धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, गंगापूर धरण ७६ टक्के भरले आहे. धरणातून सुमारे दोन हजार ७८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीला पूरसदृश परिस्थिती कायम आहे. रविवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी जिल्ह्यात सुमारे ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  गेल्या शुक्रवारपासून नाशिक जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. रविवारी मात्र नाशिककरांना दिलासा मिळाला. पावसाने काहीप्रमाणात उघडीप दिल्याने नाशिककर घराबाहेर पडले.  सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात सुमारे तीन मि.मी. पावसाची नोंद झाली, तर चोवीस तासांत १६ मि.मी. पाऊस झाला. धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा २ हजार ७८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला, तर दारणा धरणातून १० हजार ७७०, नांदूरमधमेश्वरमधून २७ हजार ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून पूरसदृश परिस्थिती कायम आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झला असून, रिमझिम सरी मात्र सुरूच आहे. सतर्कतेचा इशारा कायमगेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये मोठी वाढ झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सकाळपासून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीला दुपारनंतर पाण्याची पातळी वाढली. जिल्हा प्रशासनाने तातडीने परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना केल्या. तसेच आपत्ती निवारण कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. पावसाचा जोर कमी झाला असला तरी नदीकाठचा धोका कायम आहे.