शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

विंचूर-लासलगाव रस्तादुरुस्तीस प्रारंभ

By admin | Updated: October 28, 2016 23:51 IST

तातडीने दखल : परिसरातील नागरिकांमध्ये समाधान

विंचूर : विंचूर-लासलगाव रस्त्यावरील खड्ड्यांच्या कामास अखेर प्रारंभ करण्यात आला आहे. गत सहा ते सात महिन्यांपासून लहान-मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर रस्तादुरुस्तीस मुहूर्त मिळाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.वाहतुकीच्या व आरोग्याच्या दृष्टिकोनातून धोकादायक बनलेल्या रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भात ‘विंचूर-लासलगाव रस्त्याची झाली चाळण’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून रस्त्याची किती दुरवस्था झाली आहे हे सचित्र मांडले होते. तालुक्याच्या पूर्वभागातील गावांना लासलगावशी जोडणारा व दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण व एकमेव असलेल्या विंचूर -लासलगाव रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रि या उमटत होत्या. शिवसेनेसह विविध संघटनांनी वारंवार निवेदन देऊन रस्तादुरुस्तीची मागणी लावून धरली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झोपेचे सोंग घेतले जात असल्याने शिवसेना शहरप्रमुख नानासाहेब जेऊघाले यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर विंचूर -लासलगाव रस्त्यावरील खड्ड्यांत डांबर टाकून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला. हा रस्ता अक्षरश: उद्ध्वस्त झाल्याने रस्त्यावरून अगदी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. मात्र कालपासून खड्ड्यांमध्ये डांबर टाकून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विंचूर लासलगाव रस्त्यावर नुकत्याच झालेल्या नवीन पुलावरील खड्डे दुरुस्तीसह विंचूरपासून लासलगावपर्यंत कार्पेटचा हात मारला जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. सणासुदीच्या  पार्श्वभूमीवर वाहतुकीची वर्दळ वाढणार असल्याने रस्तादुरुस्तीस प्रारंभ करण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)