शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षांच्या देखभालीला प्रारंभ

By admin | Updated: December 30, 2016 23:08 IST

दिंडोरी : घडावर उन्हाचा परिणाम होण्याची शक्यता

पांडाणे : द्राक्षपंढरी संबोधल्या जाणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील पांडाणे परिसरात निर्यातक्षम द्राक्षे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात असताना त्या पिकाची देखभाल व निर्यात होईपर्यंत काळजी घेतली जाते. द्राक्षपिकावर वातावरणाचा परिणाम होऊन कोणत्याना कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कागद लावून काळजी घेतली जात आहे.  दिंडोरी तालुक्यात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतले जाते. खरड छाटणीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत निर्यातक्षम द्राक्षाला एकरी दोन लाखांपर्यंत खर्च येत असतो. गोडाबार छाटणीपासून ते १३५ दिवसापर्यंत व ब्रिक्स साखरेचे प्रमाण झाल्यानंतर द्राक्ष निर्यातक्षम समजले  जातात. निर्यातक्षम द्राक्षे पाठविण्यासाठी शून्य डिटेक्शन असल्यास त्या द्राक्षाला बाजारभाव चांगला मिळतो. निर्यात करत्यावेळी द्राक्षाचा नमुना लॅबमध्ये पाठवून त्याचे ० ते ५ डिटेक्शनपर्यंत नमुना आल्यास त्याची निर्यात रशिया, इंग्लंड, नेदरलॅण्ड, अमेरिका, यूके , सौदी अरेबिया व इतर राष्ट्रामध्ये द्राक्षाची निर्यात केली जाते. (वार्ताहर)