सामूहिक सूर्यनमस्कारात विद्यार्थी शिक्षकांचा उत्स्फुर्त सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 14:38 IST2020-01-18T14:36:35+5:302020-01-18T14:38:41+5:30
‘जागतिक सूर्यनमस्कार दिना’ निमित्त टि. जे. चौहान (बिटको) माध्यमिक विद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे आयोजन करण्यात आले होते

सामूहिक सूर्यनमस्कारात विद्यार्थी शिक्षकांचा उत्स्फुर्त सहभाग
नाशिक : फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला साजरा करण्यात येणाऱ्या ‘जागतिक सूर्यनमस्कार दिना’ निमित्त टि. जे. चौहान (बिटको) माध्यमिक विद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संपूर्ण सप्ताह शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी उपशिक्षिका मीनल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्काराचा सराव केला. यानंतर शनिवारी (दि.१८) सकाळी शाळेत या पार्श्वभुमिवर सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्र ीडा अधिकारी दिलीप खिल्लारे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उपशिक्षक शिवाजी मोरे यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर लोखंडे यांनी उपस्थितांना सुदृढ आरोग्यासाठी सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापक साहेबराव आहिरे व पर्यवेक्षक कीर्तिकुमार गहाणकरी, क्र ीडाशिक्षक दिनेश अहिरे, जीवन गांगोडे, नितीन कंक, प्रदीप ठाकरे, यशवंत गावित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी सूर्यनमस्कारात सहभाग नोंदवला. प्रसंगी शाळेतील राष्ट्रीय स्तरावर हॉलीबॉल खेळाच्या कर्णधार पदाचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल हिमांशी ओतारी हिचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. प्रसंगी उपशिक्षिका शोभा देवरे यांनी हास्य योगाच्या माध्यमातून कार्यक्र माचा समारोप केला.