शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत जलयुक्त शिवाराच्या कामांना गती

By admin | Updated: April 30, 2017 23:09 IST

बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील जलयुक्त शिवाराच्या कामांना गती मिळाली

बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील जलयुक्त शिवाराच्या कामांना गती मिळाली असून अडसरे खुर्द तसेच धामणी ग्रामपंचायत अंतर्गत गांगडवाडी, चव्हाटेवाडी येथे जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत शिवारफेरी काढण्यात आलीे.यावेळी इगतपुरीचे तहसीलदार अनिल पुरे यांनी गावातील जुन्या विहिरींची दुरुस्ती करण्यासाठी पाहणी केली. तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील डसरे,गांगडवाडी,चव्हाटेवाडी, या गावांना कायमच दुष्काळी परिस्थिती असते. दरवर्षी ट्रॅकरद्वारे वाडीला पाणी पुरविले जाते. जलयुक्त शिवार अभियानाच्या संयोगाने या गावांची निवड झाली असून, पहिल्या टप्प्यात सिमेंट बंधारे, शेततळे, वनतळे, जमीन सपाटीकरण, आदी महत्त्वपूर्ण उपक्र म हाती घेण्यात आले असून, दुष्काळावर मात करणे अगदी सोपे झाले आहे.यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी नितीन गांगुर्डे, वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी जे. आर. जाधव, महेश वाघ, स्थानिक स्तरचे जैन, सरपंच मंदा गोडे, उपसरपंच संगीता भोसले, कृषी सहायक रणजित आंधळे, रुपाली बिडवे, संजय भांड, कृषी सहायक आल्हाद, ज्ञानेश्वर मुंडे, बबन बांबळे आदी ग्रामस्थ शिवारफेरीत सहभागी झाले होते.पाणी अडवा पाणी जिरवा हे ब्रीद अंगीकारा, पाण्याचा प्रत्येक थेंब अन् थेंब अनमोल आहे. प्रत्येक बंधारे वेळोवेळी भरले गेले असते तर आज ही अवस्था झाली नसती. आज तालुका दुष्काळात होरपळत आहे. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पावसाचे पाणी अडवा, शेतीत ठिबक सिंचनाचा वापर करा, पाणी हेच जीवन आहे ते ओळखून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय शेवाळे यांनी केले. (वार्ताहर)