शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग सभापतिपदाच्या हालचालींना वेग

By admin | Updated: April 8, 2017 23:56 IST

सिडको : यंदाच्या मनपा निवडणुकीत भाजपाची लाट असतानाही सेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने सिडको प्रभाग सभापतिपद हे सेनेचे होणार आहे.

 सिडको : गेल्या अनेक वर्षांपासून सिडको प्रभागावर शिवसेनेचेच वर्चस्व कायम राहिले असून, यंदाच्या मनपा निवडणुकीत भाजपाची लाट असतानाही सेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने सिडको प्रभाग सभापतिपद हे सेनेचे होणार असून, सेनेकडून कोणाला संधी मिळणार याबाबत इच्छुकांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत.सिडको प्रभागात एकूण सहा प्रभाग असून, यात प्रभाग क्रमांक २४, २५, २६, २७, २८ व २९ आदिंचा समावेश आहे. या सहा प्रभागांतील २४ नगरसेवकांमध्ये सेनेचे १५, भाजपा ८ व राष्ट्रवादी कॉँग्रेस एक असे पक्षीय बलाबल आहे. सेनेच्या नगरसेवकांमध्ये सुधाकर बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी, दिलीप दातीर, प्रवीण तिदमे, श्यामकुमार साबळे, दीपक दातीर, भागवत आरोटे, चंद्रकांत खाडे, कल्पना पांडे, हर्षा बडगुजर, रत्नमाला राणे, कल्पना चुंभळे, सुवर्णा मटाले, हर्षदा गायकर, किरण गामणे आदिंचा समावेश आहे, तर भाजपाच्या नगरसेवकांमध्ये मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, राकेश दोंदे, अलका अहिरे, छाया देवांग, प्रतिभा पवार, कावेरी घुगे, भाग्यश्री ढोमसे आदिंचा तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राजेंद्र महाले असे पक्षीय बलाबल आहे. सिडको प्रभागात सेना (पंधरा) पाठोपाठ भाजपा (आठ) दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मागील निवडणुकीत सिडको प्रभागात भाजपाचा एकही नगरसेवक नव्हता, परंतु यंदाच्या निवडणुकीत भाजपाने मोठे यश संपादन करत तब्बल आठ नगरसेवक निवडून आणले आहे. एकूणच सिडको प्रभागावर सेनेचाच सभापती होणार हे निश्चित. स्थायी समितीवर शिवसेनेकडून नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी व प्रवीण तिदमे यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे १५ नगरसेवकांपैकी कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या नगरसेवकांमध्ये सुधाकर बडगुजर, कल्पना पांडे यांनी याआधी सभापतिपद अजमावले आहे, तर रत्नमाला राणे, हर्षा बडगुजर, कल्पना चुंभळे, सुवर्णा मटाले, दिलीप दातीर हे या आधीही नगरसेवक होते, तर दीपक दातीर, श्यामकुमार साबळे, भागवत आरोटे, चंद्रकांत खाडे, हर्षदा गायकर व किरण गामणे हे नवीन चेहरे महापालिकेत सामील झाले आहे. (वार्ताहर)