प्रभाग सभापतिपदाच्या हालचालींना वेग

By Admin | Updated: April 8, 2017 23:56 IST2017-04-08T23:55:48+5:302017-04-08T23:56:01+5:30

सिडको : यंदाच्या मनपा निवडणुकीत भाजपाची लाट असतानाही सेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने सिडको प्रभाग सभापतिपद हे सेनेचे होणार आहे.

Speed ​​at the office of the chairmanship of the chairmanship | प्रभाग सभापतिपदाच्या हालचालींना वेग

प्रभाग सभापतिपदाच्या हालचालींना वेग

 सिडको : गेल्या अनेक वर्षांपासून सिडको प्रभागावर शिवसेनेचेच वर्चस्व कायम राहिले असून, यंदाच्या मनपा निवडणुकीत भाजपाची लाट असतानाही सेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने सिडको प्रभाग सभापतिपद हे सेनेचे होणार असून, सेनेकडून कोणाला संधी मिळणार याबाबत इच्छुकांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत.
सिडको प्रभागात एकूण सहा प्रभाग असून, यात प्रभाग क्रमांक २४, २५, २६, २७, २८ व २९ आदिंचा समावेश आहे. या सहा प्रभागांतील २४ नगरसेवकांमध्ये सेनेचे १५, भाजपा ८ व राष्ट्रवादी कॉँग्रेस एक असे पक्षीय बलाबल आहे. सेनेच्या नगरसेवकांमध्ये सुधाकर बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी, दिलीप दातीर, प्रवीण तिदमे, श्यामकुमार साबळे, दीपक दातीर, भागवत आरोटे, चंद्रकांत खाडे, कल्पना पांडे, हर्षा बडगुजर, रत्नमाला राणे, कल्पना चुंभळे, सुवर्णा मटाले, हर्षदा गायकर, किरण गामणे आदिंचा समावेश आहे, तर भाजपाच्या नगरसेवकांमध्ये मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, राकेश दोंदे, अलका अहिरे, छाया देवांग, प्रतिभा पवार, कावेरी घुगे, भाग्यश्री ढोमसे आदिंचा तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राजेंद्र महाले असे पक्षीय बलाबल आहे. सिडको प्रभागात सेना (पंधरा) पाठोपाठ भाजपा (आठ) दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मागील निवडणुकीत सिडको प्रभागात भाजपाचा एकही नगरसेवक नव्हता, परंतु यंदाच्या निवडणुकीत भाजपाने मोठे यश संपादन करत तब्बल आठ नगरसेवक निवडून आणले आहे. एकूणच सिडको प्रभागावर सेनेचाच सभापती होणार हे निश्चित. स्थायी समितीवर शिवसेनेकडून नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी व प्रवीण तिदमे यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे १५ नगरसेवकांपैकी कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या नगरसेवकांमध्ये सुधाकर बडगुजर, कल्पना पांडे यांनी याआधी सभापतिपद अजमावले आहे, तर रत्नमाला राणे, हर्षा बडगुजर, कल्पना चुंभळे, सुवर्णा मटाले, दिलीप दातीर हे या आधीही नगरसेवक होते, तर दीपक दातीर, श्यामकुमार साबळे, भागवत आरोटे, चंद्रकांत खाडे, हर्षदा गायकर व किरण गामणे हे नवीन चेहरे महापालिकेत सामील झाले आहे. (वार्ताहर)

Web Title: Speed ​​at the office of the chairmanship of the chairmanship