शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

‘स्पीड गन’ने रोखला २५ हजार वाहनांचा वेग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:37 IST

नाशिक : वेगमर्यादेचे उल्लंघन अपघातांना कारणीभूत ठरत असल्याने शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून शहरातून जाणाऱ्या राज्य, राष्ट्रीय महामार्गांसह शहरातील अन्य ...

नाशिक : वेगमर्यादेचे उल्लंघन अपघातांना कारणीभूत ठरत असल्याने शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून शहरातून जाणाऱ्या राज्य, राष्ट्रीय महामार्गांसह शहरातील अन्य रिंगरोडवर ‘स्पीड गन व्हॅन’द्वारे करडी नजर ठेवत बेफाम वाहनांचा वेग रोखण्यात आला. वर्षभरात लॉकडाऊनचा दोन महिन्यांचा अपवाद वगळता नाशिक शहर वाहतूक शाखेने सुमारे २५ हजार ६९३ वाहनांचा वेग रोखून संबंधित वाहनचालकांना दंडाचा दणका दिला.

‘आवरा वेगाला, सावरा जिवाला’ असे प्रबोधनपर घोषवाक्य लिहिलेले फलक विविध रस्त्यांच्या कडेला नजरेस पडतात. या सूचना फलकाद्वारे वेगावर नियंत्रण ठेवत, वेगमर्यादेचे पालन करत सुरक्षित वाहतूक करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. मात्र, अशा सूचना फलकांकडे बहुतांश वाहनचालक दुर्लक्ष करतात. बेदरकारपणे भरधाव वाहने चालवित अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांना धडा शिकविण्यासाठी ‘स्पीड गन’द्वारे रस्त्यांवरून धावणाऱ्या वाहनांचा वेग अचूकरीत्या मोजला जातो. जे वाहनचालक वेगमर्यादेचे उल्लंघन करतात. अशा वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून रोखले जाते आणि दंडात्मक कारवाई करण्यात येते. गेल्या वर्षी लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून डिसेंबरअखेरपर्यंत वेगमर्यादेचे उल्लंघन करत वाहने दामटविणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. शहर वाहतूक शाखेने डिसेंबरअखेर सुमारे २५ हजार ६९३ वाहनचालकांवर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये ४ हजार ५९१ वाहनचालकांनी आतापर्यंत दंड भरला आहे. तसेच २१ हजार ११४ वाहनचालकांकडे वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडाची रक्कम थकलेली आहे. वाहतूक नियंत्रण शाखेकडून संबंधितांना आता नोटिसा धाडल्या जात आहेत.

---आलेख---

वर्षभरात केलेली कारवाई

जानेवारी- १,६६६

फेब्रुवारी- १,५५१

मार्च- २,३८२

एप्रिल- ०००

मे- ०००

जून- १,७२५

जुलै- ३,०४१

ऑगस्ट- ३,३३२

सप्टेंबर- १,७७४

ऑक्टोबर- ३,११२

नोव्हेंबर- ३,००८

डिसेंबर-४,११०

---इन्फो---

धावत्या वाहनांचा मोजला जातो ‘वेग’

शहर वाहतूक पोलीस दलाला २०१९ साली दोन ‘इन्टरसेप्टर व्हॅन’ मिळाल्या आहेत. या व्हॅनद्वारे मद्यपी वाहनचालक, चारचाकींना काळ्या फिल्मचा पारदर्शकपणा, वाहनांचा वेग अचूकपणे मोजला जातो. निश्चित केलेल्या वेगमर्यादेचे उल्लंघन संबंधित वाहनचालकांकडून केले जात असेल तर ते या व्हॅनमध्ये असलेली आधुनिक यंत्रणा स्मार्ट कॅमेऱ्यांद्वारे अचूकरीत्या हेरते आणि संबंधित वाहनाच्या आरटीओ नोंदणीकृत क्रमांकाच्या आधारे वाहनमालकाला ऑनलाइन दंडात्मक कारवाईचा मेसेज मिळतो. या व्हॅनमधील स्मार्ट कॅमेरे सुमारे १ किमी अंतरापर्यंत वाहने सहज टिपतात.

----

कोट

शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून मागील दोन वर्षांपासून नियमितपणे शहरातून जाणाऱ्या विविध महामार्गांवर ‘इन्टरसेप्टर व्हॅन’चा वापर केला जात आहे. या वाहनांमधील अत्याधुनिक यंत्रणा वाहनांचा वेग अचूकपणे मोजते. निश्चित केलेल्या वेगापेक्षा अधिक वेगाने जर वाहने चालविली गेली तर या व्हॅनच्या नजरेतून ती चारचाकी सुटत नाही आणि संबंधित वाहनमालकाला दंडाची पावती ऑनलाइन मोबाइलवर मिळते.

-पौर्णिमा चौगुले, उपायुक्त, शहर वाहतूक शाखा

---

डमी फॉरमेट आर वर २७स्पीड गन डॉक्युमेंट नावाने सेव्ह आहे.