कौशल्य पुरस्कारांचे आज होणार वितरण

By Admin | Updated: August 3, 2014 01:58 IST2014-08-03T01:29:05+5:302014-08-03T01:58:32+5:30

कौशल्य पुरस्कारांचे आज होणार वितरण

Skills Awards will be distributed today | कौशल्य पुरस्कारांचे आज होणार वितरण

कौशल्य पुरस्कारांचे आज होणार वितरण

 

नाशिक : श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघ संचलित प्रीतिसुधाजी शिक्षण फंडाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कौशल्य पुरस्कार, शिष्यवृत्ती, शैक्षणिक पुरस्कारांचे वितरण रविवारी (दि़ ३) होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष जे़ सी़ भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली़
चोपडा बँक्वेट हॉल येथे रविवारी सकाळी ९ वाजता हा सोहळा होणार आहे़ राष्ट्रसंत नम्रमुनीजी म़ सा़ , मधुस्मिताजी म़ सा़, विपुल दर्शनजी म़ सा़ यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे़ उद्योेगपती संपतलाल सुराणा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत, तर याप्रसंगी उद्योगपती सुभाष रूणवाल, रमेश धाकड, किशोर खाबिया, कीर्तीभाई कोठारी, जय कमानी आदि उपस्थित राहणार आहेत़
भंडारी यांनी सांगितले, समाजातील सर्व स्तरातील मुलांना प्रोत्साहन देऊन संस्कारक्षम पिढी घडविण्याच्या सामाजिक बांधिलकीतून या शिक्षण फं डाची स्थापना करण्यात आली आहे़ या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना विविध पुरस्कार देण्यात येतात़ समाजातील विविध क्षेत्रांत सुवर्णपदके पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य पुरस्कार देण्यात येणार आहेत़ तसेच इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे़ पत्रकार परिषदेला कन्हैयालाल बलदोटा, मोहनलाल बागमार, मोहनलाल लोढा, सुभाष लुणावत, डॉ़ सुषमा दुगड, अ‍ॅड़ विद्युल्लता तातेड आदि उपस्थित
होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Skills Awards will be distributed today